फक्त 21 दिवसांत पैसे डबल करुन देतो; बार्शीत 200 कोटींच्या घोटाळ्याने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – बार्शीच्या स्कॅममुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. बार्शीतल्या प्रत्येक चौकात, चहाच्या टपऱ्यांवर, दुकांनामध्ये केवळ एकच विषय सुरु आहे कोणाचे किती बुडाले.आरोपी विशाल फटे हा गुंतवणुकदारांनी कोणत्याही मार्गाने पैसे दिले तरी स्विकारायचा. त्यामुळे ज्यांनी वेगवेगळ्या मार्गांनी काळे धन जमा केले आहे. ते दुप्पट करण्याच्या आमिषाने विशालकडे दिले होते. आरोपी विशाल फटे याने बार्शीत बरेच मित्र जमवले होते. अगदी सख्या भावाप्रमाणे विशालचे मित्र त्याला वागणूक देत होते. विशालने याच विश्वासाचा फायदा घेत अनेक मित्रांचे अकाऊंट वापरले. गुंतवणुकदारांना मित्राच्या अकाऊंटवर पैसे टाकायला सांगायचे. मित्रांकडून चेक घेऊन ते पैसे काढून घ्यायचे असे उद्योग तो करत होता. फरार होण्याआधी देखील त्याने अशाच पद्धतीने एका मित्राच्या अकाऊंटवर जवळपास 35 लाख रुपये ट्रान्सफर केले होते. नंतर चेकद्वारे त्याने ते काढून देखील घेतले. अशी माहिती या प्रकरणातील फिर्य़ादी दीपक आंबरे यांनी दिली आहे.

कशा प्रकारे करायचा स्कॅम?
आरोपी विशाल हा गुंतवणुकदारांना स्वत: तयार केलेल्या एका वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करायला सांगायचा. जेव्हा लोक त्याला डिमॅट अकाऊंटबद्दल विचारायचे तेव्हा तुम्ही त्याची चिंता करु नका आम्ही ते लिंक करुन घेऊ असे तो सांगायचा. गुंतवणुकदारांकडून पैसे घेतल्यानंतर दर महिन्याला त्यांना कितीचा फायदा झालाय हे तो मेसेज करुन सागांयचा मात्र वास्तव्यात अकाऊंटमध्ये कोणतेही पैसे नसायचे. जेव्हा कोणी पैसे काढण्यासाठी सांगायचे तेव्हा तो त्यांना आणखी आमिष दाखवयाचा. तसेच पैसे काढल्यास नुकसान होईल अशी भिती दाखवयाचा. त्यामुळे लोक पैसे काढण्याऐवजी त्यामध्ये अधिक गुंतवणूक करायचे.

लोकांना कशाप्रकारे करायचा आकर्षित ?
आरोपी विशाल हा दरवेळी गुंतवणुकदारांना वेगवेगळी स्किम सांगून तो प्रलोभन देत होता. डिसेंबर महिन्यात अशाच पद्धतीची एक ऑफर त्याने गुंतवणुकदारांना दिली. ‘एक जानेवारी 2022 पासून एक नवीन स्कीम सुरु होत आहे. ज्यामध्ये केवळ 40 गुंतवणुकदारांना घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही स्कीम केवळ नवीन गुंतवणुकदारांसाठी आहे. या स्कीमनुसार जर 1 जानेवारी 2022 रोजी तुम्ही 10 लाख रुपये जमा केले आणि त्यानंतर 1 वर्ष कोणताही परतावा घेतला नाही तर तुम्हाला 2023 साली 6 हजार टक्के परतावा मिळेल. म्हणजेच 10 लाखांचे वर्षात 6 कोटी रुपये होतील’ अशी ऑफर त्याने दिली होती.

बड्या लोकांना हुसकावून लावायचा
विशालच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक जण पैसे घेऊन ऑफिसच्या चकरा मारत होते. ऑफिसमध्ये लोकांची गर्दीच गर्दी होती. या गर्दीत अनेक मोठे लोक देखील येत होते. मात्र तुम्हाला पैशाची काय कमी आहे. ही ऑफर सामान्यांसाठी आहे असे म्हणून तो त्यांना परत पाठवायचा. यामुळे लोकांना विशाल जणू देव आहे असेच वाटू लागले. त्यामुळे त्याच्यावर अनेक जणांनी 10 लाख रुपयांप्रमााणे कोट्यावधी रुपये विशालकडे जमा केले. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी आपल्या जमीनी विकल्या, फ्लॅटवर लोन काढले. कित्येकांनी सोने गहाण ठेवले. तर काही जणांनी तर खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन विशालकडे गुंतवणूक केली.

शिक्षणासाठी काही वर्षे पुण्यात वास्तव्य
विशालच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल काही वर्ष शिक्षणासाठी पुण्यात होता. तिथून तो बार्शीत परतला. त्याच्याकडे कोणती डिग्री होती की नाही याची कोणाला माहिती नाही. मात्र तो उत्तम इंग्रजी बोलत होता. अनेकांना केवळ आपल्या बोलण्याने त्याने भुरळ घातली होती. उच्च पदस्थ अधिकारी, राजकारण्यांसोबतचे फोटो तो लोकांना दाखवयाचा.यामुळे लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून केवळ बार्शीच नाही तर महाराष्ट्रातील अन्य भागांमधून देखील लोकांनी पैसे गुंतवले.

अनेक तरुणांना करत होता टार्गेट
बार्शीतल्या या स्कॅममध्ये सावज ठरलेले अनेक गुतंवणूकदार हे तरुण आहे. 25 ते 35 वर्षातील तरुणांचा आकडा हा मोठा आहे. या तरुणांचे केवळ आर्थिक नाही तर मानसिक नुकसान देखील मोठ्या प्रमाणात झाले आहे.

Leave a Comment