हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊनमुळे देशातील बहुतेक लोकांना वर्क फ्रॉम होम करावे लागत आहे.वर्क फ्रॉम होममुळे बर्याच लोकांसाठी शारीरिक तंदुरुस्ती टिकवणे हे एक आव्हान बनलं आहे. घर आणि ऑफिस या दोन्ही गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यामुळे लोक दिवसातून बर्याच वेळा चहा घेत असतात. जास्त चहाचे सेवन करणे आपल्या आरोग्यास हानिकारकदेखील ठरू शकते. अशा परिस्थितीत आम्ही तुमच्यासाठी तुळशीच्या चहाची एक रेसिपी घेऊन आलो आहोत ज्यामुळे तुम्ही ऍक्टिव्ह राहू शकाल.
तुळशी चहाला बेसिल टी म्हणूनही ओळखले जाते. तज्ञांच्या मते, रोगप्रतिकार शक्ती बळकट करण्याची गुणवत्ता तुळशीच्या पानात आढळते. चला तर मग जाणून घेऊया तुळशीचा चहा कसा बनवला जातो
तुळस चहा बनवायची कृती :
तुळशीची पाने -४ ते ५
पाणी – २ कप
मध – अर्धा चमचा
लिंबाचा रस – २ चमचे
तुळशी चहा बनवायची कृती :
तुळशीचा चहा बनवण्यासाठी प्रथम गॅसवरील भांड्यात पाणी तापवा.
आता उकळलेल्या पाण्यात तुळशीची पाने घाला आणि ३ ते ४ मिनिटे उकळवा.
– तुळशीची पाने पाण्यात टाकून उकळल्यास तुळशीचा रंग आणि चव दोन्ही मिसळते.
– ३ ते ४ मिनिटे पाणी उकळल्यानंतर ते गाळून घ्या.
आता त्यात १ चमचा मध आणि अर्धा चमचा लिंबाचा रस घाला.
– तुमचा मजेदार तुळशीचा चहा तयार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.