कोरोनाशी लढण्यासाठी बीसीसीआयने’पीएम केयर्स’फंडात दिले ५१कोटी रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जागतिक महामारीचा धोकादायक ठरलेल्या कोविड १९ या भयानक विषाणूविरूद्ध लढा देण्यासाठी पंतप्रधान मदत निधीला ५१ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली आणि सचिव जय शाह यांनी शनिवारी (२८ मार्च) एक निवेदन जारी केले की, कोरोनाशी लढा देण्याच्या भारताच्या लढाईत बीसीसीआय पंतप्रधान मदतनिधीला ५१ कोटींची मदत देईल.

बीसीसीआयने म्हटले आहे की लोकांचे आरोग्य ही त्यांची सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि संकटाच्या घटनेत देशाला मदत करण्यास ते वचनबद्ध आहेत. मंडळाने असेही म्हटले आहे की ते सतत परिस्थितीवर लक्ष ठेवतील आणि मदत करण्यासाठी जे काही असेल ते करतील. गांगुलीने लिहिले की, “बीसीसीआय आणि संबंधित राज्य क्रिकेट असोसिएशनने कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी मदतीसाठी ‘पीएम केयर्स’ फंडला ५१ कोटी रुपये दिले आहेत.”

यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही पंतप्रधान मदत निधी आणि मुख्यमंत्री मदत निधीला २५ लाख रुपयांची मदत दिली आहे. या कठीण काळात सचिनने मदतीचा हात पुढे केला आणि ५० लाखांची देणगी दिली. माजी भारतीय सलामीवीर आणि भाजपा खासदार गौतम गंभीर यानेही यापूर्वीच खासदार निधीतून ५० लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे.

भारतीय फलंदाज सुरेश रैनाने कोरोना पीडितांना मदत करण्यासाठी पंतप्रधान मदत निधीला ३१ लाख रुपये आणि उत्तर प्रदेश आपत्ती निवारण निधीला २१ लाख रुपये अनुदान जाहीर केले आहे. माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण आणि त्याचा भाऊ अष्टपैलू युसूफ पठाण यांनी बरोदा पोलिसांना गरजूंना वाटण्यासाठी ४००० मास्क दिले आहेत. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुलीच्या तांदूळ कंपनीच्या मदतीने गरजूंना ५० लाख तांदूळ वाटप करण्याची घोषणा केली आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना साथीच्या आजारावर उपाय म्हणून सरकारला मदत करण्यासाठी व देशाला पुढे येण्याचे आवाहन केले आहे. शनिवारी (२८ मार्च) पंतप्रधान मोदींनी एका ट्वीटद्वारे असे आवाहन केले की, “कोविड-१९च्या विरोधात लढा देण्यासाठी सहकार्य करण्याची इच्छा देशभरातील लोकांनी व्यक्त केली आहे. या भावनेचा सन्मान करण्यासाठी ‘पंतप्रधान नागरी सहाय्य आणि आपत्कालीन मदत निधी’ अर्थात ‘पीएम केयर्स फंड’ ची स्थापना केली गेली आहे. हे निरोगी भारत घडविण्यात खूप प्रभावी सिद्ध होईल. “

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’

हे पण वाचा –

महाराष्ट्रात आढळले ७ नवे करोनाबाधित;संख्या १९३वर

भारत कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे म्हणजे नेमकं काय?

भयावह! इटलीत २४ तासांत कोरोनाने घेतला ९००हून अधिक जणांचा बळी

बेजबाबदारपणाचा कळस; IAS अधिकारीचं होम क्वारंटाइनमधून पळाला

भारतात ‘या’ ठिकाणी रोबोट करणार कोरोना रुग्णांची देखभाल!

नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन