हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल सामान्य दरम्यान काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने आयपीएल स्थगित करण्यात आली आहे. त्यातच आता आयपीएलच्या उरलेल्या 31 सामन्यांचं आयोजन भारतात होणार नाही, असं बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्पष्ट केलं आहे. पण आयपीएलचं आयोजन कधी होईल, हे एवढ्या घाईने सांगता येणार नाही, असं त्याने सांगितलं.
स्पोर्ट्सस्टारशी बोलताना सौरव गांगुली म्हणाला, ‘खेळाडूंना 14 दिवस क्वारंटाईन होणं त्रासदायक ठरत आहे. आयपीएलचं आयोजन कधी होईल, हे सांगणं मुश्कील आहे, पण इंग्लंड, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि युएई स्पर्धेचं आयोजन करण्याच्या रेसमध्ये आहेत.’ ‘आयपीएल’ प्रशासकीय मंडळ आणि ‘बीसीसीआय’ सर्व शक्यतांचा विचार करून अंतिम निर्णय घेतील. जूनच्या मध्यापर्यंत हा निर्णय होणे अपेक्षित आहे. ‘‘आम्ही अन्य देशांच्या क्रिकेट मंडळांशी चर्चा करून ट्वेन्टी-२० विश्वचषकाआधी आयपीएलचे आयोजन करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत असे गांगुली म्हणाला.
दरम्यान, ‘आयपीएल’ प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनीही अनेक मंडळांशी चर्चा केल्यानंतर सप्टेंबर महिन्यात हा दुसरा टप्पा खेळवणे शक्य असल्याचे म्हटले आहे. ‘‘आम्ही आयपीएलच्या आयोजनासाठी संधीची वाट पाहत आहोत. सप्टेंबर महिन्यात आयपीएलचे आयोजन शक्य वाटत आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि अन्य क्रिकेट मंडळांच्या योजनांचा आम्ही आढावा घेत आहोत,’’ असे पटेल म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.