हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IPL 2020 चे आयोजन २९ मार्च २०२० पासून करण्यात आले होते. मात्र, कोरोनामुळं यंदाची IPL 2020 १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली होती. या स्थगितीनंतर IPL च्या यंदाच्या हंगामातील सामन्यांची संख्या कमी करून छोटेखानी IPL खेळवण्याचा विचार सुरू असल्याचे बोलले जात असतानाच आता IPL 2020 बद्दल नवीन माहिती सांगण्यात येत आहे. बीसीसीआयला कोणत्याही किंमतीवर आयपीएलचा १३ व्या हंगामाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जुलै ते सप्टेंबर दरम्यान आयपीएलच्या १३ व्या हंगामाचे आयोजन करण्याची बीसीसीआयची कल्पना आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआय कोणत्याही परिस्थितीत आयपीएल रद्द करू इच्छित नाही आहे. जर येत्या काही दिवसांत परिस्थिती सुधारली नाही तर जुलै ते सप्टेंबर दरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. वर्ष २०२० क्रिकेटचे वार्षिक कॅलेंडर लक्षात घेता युएई मधील आशिया चषक आणि सप्टेंबरमध्ये इंग्लंड-पाकिस्तान मालिका वगळता जुलै ते सप्टेंबर दरम्यान कोणतीही मोठी मालिका नाही.
तसेच इंग्लंड क्रिकेट बोर्ड जून-जुलै महिन्यात हंड्रेड नावाची स्वत:ची क्रिकेट लीग लॉन्च करणार आहे. त्यामुळे इंग्लंड आणि पाकिस्तान वगळता ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या संघांचे जुलै ते सप्टेंबरचे वेळापत्रक तितकेसे व्यस्त नाही. आशिया कप व्यतिरिक्त जुन – जुलै मध्ये भारतदेखील केवळ ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्याशी द्विपक्षीय मालिका खेळणार आहे. त्यामुळे जुलै ते सप्टेंबर या महिन्यांच्या कालावधीत IPL चे आयोजन करून, एकही सामना न वगळून, IPL भारतात किंवा परदेशात खेळवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.