विराट कोहलीची हकालपट्टीच?? बीसीसीआयने दिली होती 48 तासांची मुदत, पण….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा आक्रमक सलामीवीर रोहित शर्मा ची एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली असून माजी कर्णधार विराट कोहलीला पायउतार व्हावं लागलं. पण विराट कोहलीने स्वइच्छिने कर्णधारपद सोडलं नसून त्याला बीसीसीआयने 48 तासांचा अवधी दिला होता मात्र त्याने राजीनामा दिला नाही अशी माहिती आता समोर येत आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, विराट स्वत:हून वनडे संघाचे नेतृत्त्वपद सोडू इच्छित नव्हता. तो विश्वचषक २०२३ पर्यंत भारतीय वनडे संघाचे नेतृत्त्व करण्याच्या तयारीत होता. परंतु बीसीसीआयच्या डोक्यात वेगळीच योजना सुरू असून त्यांनी विराटला वनडे संघाचे नेतृत्त्व सोडण्यास ४८ तासांचा कालावधी दिला होता. परंतु विराटने या वेळेदरम्यान कसलीही प्रतिक्रिया न दिल्याने बीसीसीआयने स्वत:हून त्याची या पदावरुन हकालपट्टी केली आहे.

दरम्यान, विराट कोहली वन-डे क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा यशस्वी कॅप्टन होता. पण त्याच्या कॅप्टनसीमध्ये भारतीय क्रिकेट टीमला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आली नाही. बीसीसीआयनं माजी कॅप्टननं सन्मानजनक पद्धतीने पद सोडावे म्हणून त्याला 48 तासांची मुदत दिली होती. या कालावधीमध्येही विराटनं कॅप्टनसीचा राजीनामा दिला नाही, त्यामुळे त्याच्या हकालपट्टीचा निर्णय निवड समितीला घ्यावा लागला.