नवी दिल्ली । भारतात ऑनलाइन किंवा डिजिटल ट्रान्सझॅक्शन अनेक पटींनी वाढले आहेत आणि ही वाढ सुरूच आहे. ऑनलाइन पेमेंट इतकं सोपं झालंय की आता लोक चहाच्या दुकानात पाच रुपयेही ऑनलाइन भरतात. ऑनलाइन पेमेंटचे जग जितके सोपे आहे, तितकेच त्यात सतर्क राहण्याचीही गरज आहे. कारण थोडासा निष्काळजीपणा तुमचे बँक खाते रिकामे करू शकतो.
यावेळी तुमचा मोबाईल हा तुमचे वॉलेट आणि बँक खाते आहे. त्यामुळे ट्रान्सझॅक्शन दरम्यान थोडासा निष्काळजीपणा झाला तरी तुम्ही सहज सायबर फ्रॉडला बळी ठरता. त्यामुळे कोणतेही मोबाईल अॅप वापरताना सतर्क राहणे आणि सुरक्षेशी संबंधित उपायांचे पालन करणे आवश्यक आहे.
UPI एड्रेस शेअर करू नका
सायबर फसवणूक टाळण्यासाठी तुमचा UPI एड्रेस कधीही कोणाशीही शेअर करू नका. तुमचा UPI एड्रेस तुमचा फोन नंबर, QR कोड किंवा व्हर्च्युअल पेमेंट एड्रेस (VPA) मधील काहीही असू शकतो. तुम्ही कोणत्याही पेमेंट किंवा बँक अॅप्लिकेशनद्वारे तुमच्या UPI अकाउंटमध्ये प्रवेश करू देऊ नये.
अनेक वेळा लोकांना फोन येतात की ते बँक किंवा पेमेंट अॅप कंपनीशी बोलत आहेत आणि ते तुम्हाला तुमच्या डिजिटल ट्रान्सझॅक्शनशी संबंधित माहिती विचारतात. हे अजिबात करू नका, कारण हे कॉल फसवे आहेत.
UPI अॅप अपडेट करत रहा
लोकं अनेकदा ही चूक करतात की ते पेमेंटसाठी वापरत असलेले अॅप अपडेट ठेवत नाहीत. मोबाईल अॅप अपडेट करत राहणे महत्त्वाचे आहे. UPI पेमेंट अॅपसह प्रत्येक अॅप नवीन व्हर्जनमध्ये अपग्रेड केले जावे कारण अॅप अपडेट्स तुमचे अॅप जास्त सुरक्षित करतात. अॅप्सना नवीन व्हर्जनमध्ये अपग्रेड केल्याने तुमचे खाते सुरक्षित राहते.
एकापेक्षा जास्त अॅप्स वापरू नका
डिजिटल पेमेंट किंवा व्यवहारांसाठी एकापेक्षा जास्त अॅप्स वापरू नका. कारण अनेक अॅप वापरताना गैरसमज होण्यास वाव असतो. अॅपमध्ये काही समस्या असल्यास मदत केंद्राची मदत घ्या. याबाबतीत बाहेरच्या कोणाचीही मदत घेऊ नका.
अनोळखी लिंक्स किंवा फेक कॉल्स देखील अटेंड करू नका
विचार न करता कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका. UPI स्कॅमचा वापर हॅकर्स युझर्सना अडकवण्यासाठी करतात. हॅकर्स लिंक शेअर करतात किंवा कॉल करतात आणि युझर्सना व्हेरिफिकेशनसाठी नवीन अॅप डाउनलोड करण्यास सांगतात. तुम्ही अशा लिंकवर कधीही क्लिक करू नये किंवा पिन किंवा इतर कोणतीही माहिती कोणाशीही शेअर करू नये. बँका कधीही पिन, ओटीपी किंवा इतर कोणतेही पर्सनल डिटेल्स विचारत नाहीत.