शाखेत बॉल गेल्याने संघ कार्यकर्त्यांमध्ये आणि खळाडूंमध्ये तुंबळ हाणामारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कानपुर : हॅलो महाराष्ट्र – उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शाखेत बॉल गेला म्हणून क्रिकेट ग्राउंडवर संघाचे कार्यकर्ते आणि खेळाडूंमध्ये जोरदार हाणामारी झाली.या मारहाणीत सहा जण जखमी झाले आहेत. ही घटना नौबस्त पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बालाजी पार्कमध्ये घडली आहे. संघाच्या (RSS) शाखेत क्रिकेट खेळताना बॉल गेल्याने आरएसएस कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांमध्ये हा वाद झाला आहे. या वादाचे पुढे रूपांतर मारहाणीत झाले. या घटनेत सहा जण जखमी झाले आहेत. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायलर झाला आहे.

जागेवरून वाद
हाती आलेल्या माहितीनुसार, या दोन गटात जागेवरून वाद झाला. आरएसएसच्या कार्यकर्त्यांना तिथे शाखा लावायची होती, तर विद्यार्थ्यांना क्रिकेट खेळायचे होते.राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या कार्यकर्त्यांनी संबंधित जागेवर शाखा लावली, यावेळी तिथेच हे विद्यार्थी देखील क्रिकेट खेळत होते. क्रिकेट खेळताना बॉल संघाच्या शाखेत गेला. यावरून हा वाद सुरु झाला आणि पुढे तो मारमारीपर्यंत पोहोचला.

काय आहे नेमके प्रकरण ?
सविस्तर माहिती अशी कि, विद्यार्थी या मैदानात क्रिकेट खेळत होते. तर याच मैदानात दुसऱ्या एका जागेवर आरएसएसची (RSS) शाखा सुरू होती. खेळताना एका विद्यार्थ्याने बॉल जोरात फटकावला. हा बॉल थेट आरएसएसच्या शाखेत गेला. आरएसएस कार्यकर्त्यांनी बॉल देण्यास नकार दिला. तुमच्या खेळण्यामुळे शाखा डिस्टप होत असल्याचे या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. मात्र विद्यार्थी बॉल परत देण्याच्या मागणीवर ठाम होते. यातूनच वाद सूरू झाला आणि या वादाचे मारहाणीत रूपांतर झाले. या प्रकरणाविरोधात एका गटाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment