मित्रानेच मित्राची डोक्यात दगड घालून केली निर्घृणपणे हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये मित्रानेच मित्राच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्घृणपणे हत्या केली आहे. किरकोळ वादातून सूड भावनेने पेटलेल्या तरुणाने भर झोपेत डोक्यात दगड घालून मित्राची हत्या केली आहे. बीड तालुक्यातील ढेकणमोहा या ठिकाणी आज सकाळी हि धक्कादायक घटना घडली आहे. मृत व्यक्ती आणि आरोपी हे दोघे पश्चिम बंगालचे रहिवाशी आहेत. हैदरअली तरफदार अब्दुल हसन तरफदार असे मृत व्यक्तीचे नाव आहे तर सीमोल बिश्वास विपेंद्रनाथ बिश्वास असे आरोपी तरुणाचे नाव आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
बीडच्या ढेकणमोहा येथे अहमदनगर- बीड- परळी रेल्वेमार्गाच्या पुलाचे काम सुरू आहे. या कामासाठी पश्चिम बंगाल येथील मजूर ढेकणमोहा येथे पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. काल रात्री साडेनऊ वाजता हैदरअली तरफदार आणि सीमोल बिश्वास हे दोघे जेवणासाठी बसले. जेवत असताना त्यांनी दारूसुद्धा प्यायली. यादरम्यान त्यांच्या मोठा वादसुद्धा झाला. त्यानंतर हैदरअली तरफदार याने सीमोलच्या नाकावर बुक्की मारली तेव्हा त्याच्या नाकातून रक्त वाहू लागले. यानंतर सीमोल दवाखान्यात जाण्यासाठी गावात आला. यानंतर पुन्हा कामाच्या ठिकाणी पोहोचला. मात्र तोपर्यंत हैदरअली झोपला होता. त्यानंतर सीमोल बिश्वास याने दगड डोक्यात घालून त्याची हत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर ठाण्याचे सहायक निरीक्षक बाळासाहेब आघाव यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी सीमोल बिश्वास याला अटक केली. त्याने नेमकी कोणत्या कारणामुळे हत्या केली याचे कारण पोलीस तपासात समोर येईल. नगर बीड परळी रेल्वे महामार्गच्या कामासाठी पश्चिम बंगाल वरून आलेल्या मजुरांचा जेवणाच्या शुल्लक कारणावरून झालेल्या वादातून झोपलेल्या मित्राच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment