मुंबई । आयपीएल यावर्षी युएईमध्ये होणार असल्याची घोषणा बीसीसीआयने केली आहे. पण IPLच्या आधी भारतीय संघाला एक तरी आंतरराष्ट्रीय मालिका खेळावी लागण्याची शक्यता आहे. कोरोना व्हायरसमुळे टीम इंडियाच्या इतर संघाविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका रद्द झाल्या होत्या. दरम्यान, आता बीसीसीआयवर स्टॉक होल्डरांकडून दबाव टाकला जात आहे की त्यांनी २६ सप्टेंबरच्या आधी क्रिकेट मालिका खेळावी. यात दक्षिण आफ्रिका संघासोबतची मालिका खेळली जाण्याची सर्वात जास्त शक्यता आहे.
मार्च महिन्यात जेव्हा आफ्रिकेविरुद्धची मालिका स्थगित करण्यात आली होती तेव्हा ही मालिका ऑगस्टमध्ये होईल असे ठरवण्यात आले होते. दोन्ही संघ ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळेल. पण ही मालिका एफटीपीचा भाग नसले असं सांगण्यात आलं होत. या द्विपक्षीय मालिकेबाबत आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांना विचारले असता ते म्हणाले, या संदर्भात गव्हर्निंग काउंसलिंगच्या बैठकीत चर्चा केली जाईल त्यानंतरचं काही सांगता येईल असं पटेल म्हणाले.
दरम्यान, कोरोना व्हायरसनंतर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरू झाले. त्यानंतर पाकिस्तानचा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात करणार आहे. भारताचा विचार केल्यास टीम इंडिया या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. पुढील आठवड्यात बीसीसीआयसोबत करार झालेले खेळाडू अहमदाबाद येथे नॅशनल कॅम्पमध्ये एकत्र येतील. या कॅम्पमध्ये खेळाडू एकत्र सराव करणार आहेत. खेळाडू फिटनेसवर काम करतील आणि त्यानंतर बीसीसीआय आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० सामन्याचे ऑगस्टमध्ये आयोजन करू शकेल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”