हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू असलेल्या Ben Stokes ने नुकतेच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. बेन स्टोक्सने इंग्लंडसाठी अनेक शानदार खेळी केल्या. जेव्हा-जेव्हा संघाला गरज होती तेव्हा तेव्हा स्टोक्स मैदानावर अक्षरशः धावून आला. त्याने संघाला अनेक वेळा ‘अशक्य’ असलेले विजय मिळवून दिले. मात्र आता इथून पुढे आपण स्टोक्सला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये खेळताना पाहू शकणार नाही. तो मंगळवारी डरहममध्ये शेवटचा वनडे सामना खेळणार असल्याचे म्हंटले आहे.
Ben Stokes ने सोमवारी सोशल मीडियावर आपल्या निवृत्तीची माहिती दिली. आता तो मंगळवारी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामालिकेतील पहिल्या वनडे सामन्यामध्ये खेळणार आहे. हे लक्षात घ्या कि, डरहम हे त्याचे घरचे मैदान आहे. येथील चेस्टर-ले-स्ट्रीट स्टेडियमवरून तो या फॉरमॅटला रामराम करणार आहे. मात्र तो टी-20 आणि कसोटी फॉरमॅट मध्ये खेळतच राहणार आहे. सध्या कसोटी संघाचा कर्णधारपद हे स्टोक्सकडे आहे. चला तर या निमित्ताने आपण एकदिवसीय फॉरमॅट त्याच्या 5 सर्वोत्तम खेळींवर एक नजर टाकुयात…
2019 सालच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंड संघाला अशक्यप्राय विजय मिळवून देणारा Ben Stokes च होता. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना 8 बाद 241 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करत असलेल्या इंग्लंडच्या 4 विकेट 86 धावांवर पडल्या. यानंतर संघाची धुरा बेन स्टोक्स आणि जोस बटलरने सांभाळली. यावेळी डावाच्या शेवटच्या चेंडूवर इंग्लंडला विजयासाठी 2 धावांची गरज असताना मार्क वुड धावबाद झाला आणि सामना बरोबरीत संपला. यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघांनी 15-15 धावा केल्या. मात्र जास्त चौकार मारण्याच्या नियमामुळे यावेळी इंग्लंडला विजेता म्हणून घोषित करण्यात आले. या सामन्यात स्टोक्सने 98 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकार ठोकले. सामनावीराचा किताबही त्यालाच देण्यात आला. अशा प्रकारे त्याने इंग्लंडला आपला पहिला वाहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकून दिला.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी-2017 मधील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यातही Ben Stokes ने शानदार विजय मिळवून दिला. बर्मिंगहॅममध्ये खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करत 9 गडी बाद 277 धावा केल्या होत्या. यावेळी लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंड संघाने 35 धावांत 3 विकेट गमावल्या. अशा परिस्थितीत कर्णधार इऑन मॉर्गन आणि बेन स्टोक्सने डाव सांभाळला. मॉर्गन 87 च्या वैयक्तिक धावसंख्येवर धावबाद झाला मात्र स्टोक्सने शेवट्पर्यंत टिकून राहत आपले शतक पूर्ण केले. या सामन्यात त्याने 102 धावांची नाबाद खेळी केली. जी वनडेतील त्याची सर्वोत्तम धावसंख्याही आहे. यावेळी इंग्लंडने डीएल नियमानुसार हा सामना 40 धावांनी जिंकला. वास्तविक, या नियमानुसार त्यांना 201 धावा करायच्या होत्या, मात्र जेव्हा पाऊस पडला तेव्हा इंग्लंडची धावसंख्या 240 होती. यावेळीही स्टोक्सला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
गेल्या वर्षी पुण्यामध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडने भारताकडून मिळालेले 337 धावांचे लक्ष्य यशस्वीरीत्या पूर्ण केले होते. यामध्ये बेन स्टोक्सचा मोठा हातभार होता. भलेही Ben Stokes शतकापासून फक्त 1 धाव दूर राहिला असेल मात्र आपल्या 52 चेंडूंच्या खेळीत त्याने 4 चौकार आणि 10 षटकार खेचले. यावेळी 124 धावा करणाऱ्या जॉनी बेअरस्टोला सामनावीर घोषित करण्यात आले. या सामन्यात इंग्लंडने 43.3 षटकांत 4 गडी गमावून 337 धावांचे लक्ष्य गाठले.
फलंदाजी बरोबरच Ben Stokes ने अनेकवेळी गोलंदाजीतही कमाल दाखवली. या फॉरमॅटमध्ये त्याने एकूण 74 विकेट घेतल्या. साउथॅम्प्टनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या एका सामन्यात त्याने 5 विकेट घेऊन स्वतःला सिद्ध केले. 16 सप्टेंबर 2013 रोजी झालेल्या त्या सामन्यात मात्र इंग्लंडचा 49 धावांनी पराभव झाला. यावेळी ऑस्ट्रेलियाने 298 धावा केल्या होत्या तर इंग्लिश संघ 249 धावांत सर्वबाद झाला. या सामन्यात स्टोक्सने 61 धावांत 5 बळी घेतले.
3 वर्षांपूर्वी नॉटिंगहॅममध्ये पाकिस्तानने इंग्लंडला 340 धावांचे मोठे आव्हान दिले होते. यावेळी Ben Stokes आणि जेसन रॉयमुळे इंग्लिश संघाने हे अशक्य वाटणारे आव्हान सहजरित्या पार केले. 17 मे 2019 रोजी झालेल्या या सामन्यात जेसन रॉयने 89 चेंडूत 11 चौकार आणि 4 षटकारांसह 114 धावा केल्या. तर स्टोक्सने 64 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 71 धावा केल्या. त्याची ही खेळी देखील आठवणीत राहील.
आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत Ben Stokes ने आतापर्यंत 104 सामन्यांमध्ये एकूण 2919 धावा केल्या आहेत. तसेच त्याच्या नावावर 3 शतके आणि 21 अर्धशतके देखील जमा आहेत. वनडेमध्ये त्याने एकूण 88 षटकार आणि 238 चौकार लगावले आहेत. आता आपल्या कारकिर्दीतील शेवटच्या एकदिवसीय सामन्यात स्टोक्स आपल्या बॅटने किंवा चेंडूने चमत्कार दाखवतो हे पाहणे रंजक ठरेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.cricbuzz.com/profiles/6557/ben-stokes
हे पण वाचा :
इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज Ben Stokesची वनडे क्रिकेटमधून निवृत्ती
Bank FD : आता ‘या’ 2 मोठ्या बँकांनी देखील FD वरील व्याजदरात केली वाढ !!!
LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये दररोज 238 रुपयांची गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर मिळवा 54 लाख रुपये !!!
SBI ने ग्राहकांसाठी सुरु केली Whatsapp बँकिंगची सुविधा !!!
Post Office च्या ‘या’ योजनेमध्ये गुंतवणूक करून दरमहा कमाईची संधी !!!