हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंग्लंडचा कसोटी संघाचा नवोदित कर्णधार Ben Stokes ने नुकतीच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो अवघ्या 31 वर्षांचा आहे. स्टोक्सने नुकतेच आपल्या मानसिक आरोग्याबाबतचा एक खुलासा केला आहे. यावेळी त्याने आपल्या मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी औषध घेत असल्याचे सांगितले.
Ben Stokes म्हणाला की,” सहसा लोकं अशा गोष्टींबद्दल बोलायला थोडे घाबरतात. त्यांना असे वाटते की, हे दुर्बलतेचे लक्षण आहे. मात्र मला याची लाज वाटत नाही कारण त्यावेळी मला या गोष्टीची गरज होती.”
वडिलांच्या निधनाने पडला एकटा
Amazon च्या एका डॉक्युमेंट्रीमध्ये बोलताना Ben Stokes ने सांगितले की, दोन वर्षांपूर्वी त्याचे वडील जेरार्ड स्टोक्सचे निधन झाले. स्टोक्सने पुढे सांगितले की, त्याला कधीच वाटले नव्हते कि, Anxiety साठी औषधाची गरज भासेल. वडिलांच्या मृत्यूने तो पूर्णपणे एकटा पडला आहे. Ben Stokes म्हणाला की, मी अजूनही डॉक्टरांशी याबाबत बोलतो आहे आणि माझे औषध घेत आहे. हे जाणून घ्या कि, आपल्या मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी गेल्या वर्षी स्टोक्सने काही काळ क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता.
जो रूटने केले कौतुक
दुसरीकडे, इंग्लंडचा महान फलंदाज जो रूटने स्टोक्सचे कौतुक केले आहे. तो म्हणाला की,” लोकं सहसा उघडपणे अशी गोष्ट सर्वांसमोर आणत नाहीत. मात्र Ben Stokes ने या गोष्टी समोर ठेवल्याने तो धाडसी असल्याचे दिसून येते.”
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.cricbuzz.com/profiles/6557/ben-stokes
हे पण वाचा :
India vs Pakistan : “मियांदादचा तो षटकार आजही झोपू देत नाही” – कपिल देव !!!
Technology : कॉम्प्युटरवरून चुकून डिलीट झालेल्या फाईल्स अशाप्रकारे करा रिकव्हर !!!
Investment Tips : वयाच्या 21 व्या वर्षापासून अशाप्रकारे गुंतवणूक सुरू करून मिळवा लाखो रुपये !!!
‘या’ Multibagger Stock ने एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला दुप्पट नफा !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण, आजचे नवीन दर पहा