कडू कारल्याचे लाभकारी औषधी गुणधर्म

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कारलं म्हंटल कि अनेकांच्या चेहऱ्याचा रंग व बदलतो. कारण कारलं हे सहसा कोणालाही आवडत नाही लहान मुलं तर कारलं म्हंटल कि दिवसभर जेवणाराही नाहीत. परंतु कोणत्याच अश्या भाज्यांमध्ये कारल्यासारखे सात्वीक गुणधर्म नाहीत. अनेकांना कारल्याचं नाव ऐकताच त्याच्या जीभेची चव कडवट होते. पण कारल्याच्या कडूपणावर जाऊ नका. कारण कारल्याइतकी बहुगुणी भाजी दुसरी कोणती नसेल.

कारलं याचे अनेक फायदे आहेत. ग्रीष्मात आढळणाऱ्या भाज्यांमध्ये कारले एक आहे. त्यात फॉस्फऱस भरपूर असते. कारल्यामुळे कफ कमी होतो. बद्धकोष्ठ बरे होण्यास कारल्याची मदत होते. आहारात त्याचा अंतर्भाव केल्यास जेवण व्यवस्थित पचते. शिवाय भूकही चांगली लागते. लहान मुलांना कारल्याची भाजी दिली असता त्याच्या पचन क्रियेवर चांगला परिणाम होतो.

दमा असलेल्यांनी मसाला न टाकलेली कारल्याची भाजी खाल्ल्यास फायदेशीर आहे. पोटात गॅस वा अपचन झाल्यास कारल्याचा रस घ्यावा. पक्षाघात झालेल्या रूग्णांना कच्चे कारले फायदेशीर ठरते. तसेच कारलं हे कडू असते त्यामुळे मधुमेह असणाऱ्या लोकांच्या आहारात कारल्याचा समावेश असणे गरजचे आहे. कारण कारल्या मध्ये कोणत्याच प्रकारची साखर नसते. त्यामुळे साखर वाढण्याचा प्रश्न निर्माण होत नाही.

उलट्या किंवा जुलाब होत असल्यास कारल्याच्या रसात थोडे पाणी मिसळून, त्यात काळे मीठ टाकून सेवन करावे. लगेचच फरक पडतो. यकृताच्या रोगांसाठी कारले रामबाण औषध आहे. जलोदर झाल्यास किंवा यकृत वाढल्यास अर्ध्या कप पाण्यात दोन मोठे चमचे कारल्याचा रस मिसळावा व रोज बरे होईपर्यंत तीन चार वेळा सेवन करावे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment