हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक वेळा संगितले जाते कि, दिवसातून कमीत कमी दोन वेळा तरी दात घासले पाहिजे. हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. अनेक वेळा जाहिराती मध्ये सांगितले जाते कि सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी दोनदा दात घासले पाहिजेत, कारण जर रात्रभर जेवणाचे कण जर आपल्या तोंडात राहिले तर आपल्या तोंडातील बॅक्टरीया त्या कणांचे छोट्या छोट्या भागांमध्ये विभाजन करते त्यामुळे आपल्या तोंडाचा घाण वास येतो. त्यामुळे रात्री झोपताना दररोज दात घासले पाहिजेत.
एका संशोधनातून समोर आले आहे कि, जर सारखे दात घासले तर तुमच्या दाताबरोबर तुमचे शरीर सुद्धा निरोगी राहणार आहे. शोकागो मध्ये झालेल्या संशोधनात असे सांगितले आहे कि, दिवसातून दोन वेळा जे लोक दात घासतात त्या लोकांना हृदयाचा त्रास होत नाही. शिकागो मध्ये झालेल्या संशोधनात असे म्हंटले आहे कि , आत्तापर्यंत त्यांनी जवळ पास ६६२ लोकांच्या दात घासण्याचा सवयींबद्धल जाणून घेतले आहे त्यातून हे निष्पन्न झाले आहे कि, ज्या लोकांना दररोज किमान दोन वेळा दात घासण्याच्या सवयी आहे. त्या लोकांना हृदयाच्या समस्या या कमी प्रमाणात आहेत. त्याच प्रमाणात जे लोक फक्त दिवसातून एकदाच दात घासतात त्या लोकांना दाताच्या समस्यांबरोबर हृदयाच्या पण काही समस्या निर्माण होतात. त्यासाठी दिवसातून कमीत कमी दोन वेळा आणि किमान दोन मिनिटे दात घासले गेले पाहिजेत असा दावा संशोधनात सामील असलेल्या संशोधकांनी केला आहे.
संशोधनात सहभागी झालेले प्रमुख अभ्यासक डॉक्टर शोगो मंटूसई म्हणाले कि, दात घासण्याचा सवयी याचा संबंध हा मौखिक आरोग्याशी असतो. आणि मौखिक आरोग्य हे हृदयाशी संबंधित असते. त्यामुळे जास्त वेळा दात घासल्याने आपले हृद्य निरोगी राहण्यास मदत होते, या संशोधनात त्याच्या कारणे आणि परिणाम याचा अभ्यास करण्यात आला नाही त्यामुळे हे संशोधन हे अर्धवट आहे असे मानले जाते. त्यामुळे सारखे दात घासणे हि सवय वाईट नाही त्यामुळॆ तुमचे आरोग्य हे चांगले राहण्यास मदत होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’