हिवाळ्यात स्ट्रॉबेरी खाल्ल्याने होतात ‘हे’ जबरदस्त फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या हिवाळा असून या कडाक्याच्या थंडीच्या काळात फळे खाणे आरोग्यसाठी फायदेशीर असते. कारण फळांमध्ये असलेले अनेक गुणधर्म आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. थंडीच्या मोसमात लालेलाल रंगाच्या स्ट्रॉबेरी भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. आज आपण जाणून घेऊया हिवाळ्याच्या दिवसात स्ट्राबेरी खाण्याचे आरोग्यदायी फायदे….

स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटामिन आणि फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. यात पॉलिफेनोल्स नावाचे अँटी-ऑक्सिडेंट देखील मोठ्या प्रमाणात असतात.

स्ट्रॉबेरीचे सेवन केल्यांने त्वचेला फायदा होतो. स्ट्रॉबेरी मुळे त्वचा तजेलदार होते. याशिवाय आपल्या त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्याही कमी होतात.

स्ट्रॉबेरीत असणारे फोलेट, अँटीऑक्‍सीडेंट, फ्लेवोनॉइड,आणि केंफेरॉल ही तत्व कॅन्सर होण्यास कारणीभूत असणाऱ्या पेशी नष्ट करतात

स्ट्रॉबेरीमध्ये की जीवनसत्त्व असतात. पोटॅशियम, मॅग्नेशियम असल्यामुळे हाडांसाठी त्या फायदेशीर आहेत. स्ट्रॉबेरीमुळे हाडं दुखण्याचा त्रासही कमी होतो म्हणून थंडीत स्ट्रॉबेरी भरपूर खावी.

स्ट्रॉबेरीमध्ये सायट्रीक आम्ल असतात त्यामुळे दातांचा पिवळेपणा कमी होऊन दात अधिक चमकदार होतात. तसेच हिरड्या मजबुत होण्यास मदत होते.