Property Tax म्हणजे काय ??? ते भरण्याचे फायदे जाणून घ्या

Property Tax
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Property Tax : जर आपण एखाद्या शहरात किंवा गावात राहत असाल आणि आपली एखादी मालमत्ता किंवा घर असेल तर आपण प्रॉपर्टी टॅक्सबाबत ऐकले असेलच. तसेच आपल्या मालमत्तेसाठी टॅक्स भरला असेलच. हे जाणून घ्या की, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून प्रत्येक क्षेत्राच्या स्थावर मालमत्तेवर मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स लावला जातो. याचा वापर रस्ते, शिक्षण, स्वच्छता इत्यादी कामांसाठी केला जातो. आजच्या या बातमीमध्ये आपण रबसल्या प्रॉपर्टी टॅक्स कसा भरावा आणि तो भरण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.

Property Tax Online: Complete Guide about Property Tax, Calculation &  Payment

Property Tax म्हणजे काय ???

प्रॉपर्टी टॅक्सला हाऊस टॅक्स असेही म्हणले जाते. पंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे स्थावर मालमत्तेच्या मालकांकडून घेण्यात येणार हा टॅक्स आहे. सामान्यतः सर्व प्रकारच्या स्थावर मालमत्तेवर हा टॅक्स लावला जातो. यामध्ये सर्व प्रकारच्या निवासी आणि व्यावसायिक मालमत्तांचा समावेश आहे. मात्र, रिकाम्या भूखंडांवर हा टॅक्स आकारला जात नाही.

Andhra Pradesh Property Tax : House Tax Andhra Pradesh Online Payment

Property Tax भरण्याचे फायदे जाणून घ्या

स्थानिक संस्थांकडून जमा केला जाणारा हा टॅक्स आपल्या परिसराच्या स्थानिक नागरी सुविधा जसे की, रस्ते, सांडपाणी व्यवस्था, प्रकाश व्यवस्था, उद्याने आणि इतर मूलभूत सुविधा राखण्यासाठी वापरला जातो. तसेच आपल्याला किती टॅक्स भरावा लागेल हे आपल्या मालमत्तेच्या मूल्यावरून ठरवले जाते. जर आपण वेळेवर टॅक्स भरला, तर यामुळे अनावश्यक दंड भरण्यापासून वाचू शकाल. यासोबतच आपल्याला टॅक्स आणि मालमत्तेच्या किमतींशी संबंधित अनेक फायदे देखील मिळतात. जे वार्षिक आधारावर दिले जातात. त्याच्या पेमेंटमध्ये उशीर झाल्यास देय रकमेवर व्याज म्हणून 2 टक्क्यांपर्यंत दंड आकारला द्यावा लागू शकतो.

What is Property Tax and How Property Tax is Calculated | IDFC FIRST Bank

Property Tax कसा भरावा ???

प्रॉपर्टी टॅक्स भरण्यासाठी आपल्या भागातील महापालिका कार्यालयात किंवा संबंधित बँकांना भेट देता येईल. यासाठी प्रॉपर्टी टॅक्स नंबर किंवा अकाउंट नंबर द्यावा लागेल. आजकाल बहुतेक पालिका टॅक्स भरण्यासाठी प्राधिकरणाच्या वेबसाइटवर ऑनलाइन सुविधाही उपलब्ध देत आहेत. यामध्ये आपले ठिकाण, वय, मालकाचे निव्वळ उत्पन्न, मालमत्तेचा प्रकार इत्यादी आधारे प्रॉपर्टी टॅक्स भरण्यामध्ये सूट मिळते.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://rdd.maharashtra.gov.in/en/tax-home

हे पण वाचा :
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Multibagger Stock : फार्मा क्षेत्रातील ‘या’ दिग्गज कंपनीने गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये
आता First Republic Bank लाही लागणार टाळे, आठवड्याभरात अमेरिकेतील तिसरी बँक दिवाळखोर
Post Office च्या ‘या’ योजनांमध्ये 1 एप्रिलपासून होणार तीन मोठे बदल
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत झाली वाढ, पहा आजचे दर