हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक वेळा दही खाणे आरोग्यासाठी चागले आहे असे म्हंटले जाते. पण दही हे जास्त प्रमाणात पावसाळ्यात खाण्यास मनाई केली जाते . हिवाळा आणि पावसाळा या वेळी ऋतूंमध्ये मोठ्या प्रमाणात बद्धल होतो. त्याच काळात दही खाणे हे शरीरासाठी जास्त धोकादायक म्हंटले जाते. थंड आणि मधुर दही कोणाला आवडत नाही? दही कशा सोबतही खा. त्याची चव वाढवतेच. दही फक्त आहाराची लज्जतच वाढवत नाही तर आरोग्यही प्रदान करते. म्हणून तर सर्व आहार तज्ञांची यादी दह्याशिवाय सुरु आणि पूर्ण होत नाही. उन्हाळाच्या दिवसात दही खाणे जास्त महत्वाचे आहे. कारण दह्यामध्ये जास्त प्रमाणात थंडता हा गुण असतो.
सर्वच प्राण्यांचे दुध आणि दुग्धजन्य पदार्थ पौष्टिक आहेत, परंतु या पौष्टीकतेमध्ये दह्याचा क्रमांक वरचा लागतो कारण दह्यासोबत खाल्लेले अन्न सहज पचते आणि त्या अन्नातील जीवनसत्वे आणि प्रथिने सहजरीत्या रक्तात आणि शरीरात शोषली जातात. म्हणून दह्याला ‘परिपूर्ण आहार‘ म्हणून सर्वत्र मान्यता आहे. पोट भरल्याचे समाधान टिकून राहते.
दही खाण्याचे फायदे —
–हृदय विकाराची शक्यता कमी होते
–जीवनसत्वानी परिपूर्ण
–आतड्यांचे आरोग्य सुधारते
–चेहरा,त्वचा उजळते
–केसांसाठी उपयुक्त
–मानसिक स्वास्थ्यासाठी
— दही हे भरपूर प्रथिनांनी युक्त असा आहार आहे. त्याच्या सेवनाने शरीराची झीज भरून काढण्याचे काम केले जाते.
–ऊर्जेने युक्त असा हा आहार आहे.
— दही च्या सेवनाने प्रतिकारशक्ती वाढते
— अनेक वेळा मधुमेह नियंत्रित ठेवणे कठीण जाते. दही चा आहारात समावेश केल्याने मधुमेह नियंत्रित राहतो
–पचन क्रिया सुधारते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’