हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : आजच्या घडीला माणूस चंद्रावर जाऊन आलाय, त्याने असाध्य रोगांवर विजय मिळवला अन् बरेच समाजपयोगी शोध लावले पण अजूनही लोड शेडींग सारख्या सामाजिक संकटावर उपाय शोधणे त्याला जमले नाही. आजही भारत देश सुजलाम सुफलाम असूनही अनेक खेड्यापाड्यांत कित्येक तास वीज गायब असते. ज्यांच्या कडे इन्व्हर्टर आहे त्यांना ह्या वीजटंचाईतून तात्पुरता दिलासा मिळतो पण ज्यांच्याकडे इन्व्हर्टरही नाही त्यांना सध्या सुरु असलेल्या कडक उन्हाचा नाहक त्रास सहन करावा लागतो. सध्या तरी आपण गर्मीच्या ह्या दिवसांत पंख्या खाली बसून थंड हवा खाण्याचा प्रयत्न करतो पण जर वीजच नसेल तर पंखा तरी कसा चालणार?
आज आम्ही तुमच्या साठी एक असा पंखा घेऊन आलो आहोत त्याचा वापर करून तुम्ही वीजेशिवायही तासन तास थंड हवा घेऊ शकता तेही फक्त 445/- रुपयात. आता तुम्ही फक्त 445/- रुपयात पोर्टेबल फॅन घरी घेऊन जाऊ शकता जो तुम्हाला उन्हाळ्यात अनेक तास हवा देईल. त्यासाठी तुम्हाला प्रथम हा पंखा चार्ज करावा लागेल. हा पंखा चालवण्यासाठी तुम्हाला वीज किंवा इन्व्हर्टरची गरज भासणार नाही.
केस प्लस रिचार्जेबल बॅटरी ऑपरेटेड मिनी यूएसबी फॅन
हा रिचार्जेबल फॅन यूएसबी केबलद्वारे चार्ज होतो. बॅटरीवर चालणारा हा पंखा पोर्टेबल आहे म्हणजेच तो कुठेही नेला जाऊ शकतो आणि केव्हाही वापरला जाऊ शकतो. हा मिनी एअर कुलर फॅन ऑफिस, मुलांची खोली, स्वयंपाकघर आणि बेडरूममध्ये सर्वत्र वापरता येईल.