Tuesday, June 6, 2023

RRR फेम अभिनेत्याचं निधन; सिनेसृष्टीवर शोककळा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एस. एस. राजामौली दिग्दर्शित RRR या चित्रपटात खलनायकची भूमिका पार पाडणारा अभिनेता स्टीवेन्सन यांचं निधन झाले आहे. वयाच्या 58 व्या वर्षी इटली मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने चित्रपट विश्वावर शोकळला पसरली आहे.

आरआरआर चित्रपटाच्या टीमकडून त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर स्टीवेन्सन यांच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे. ‘आम्हा सर्वांसाठी ही अत्यंत धक्कादायक बातमी आहे. तुम्ही सदैव माझ्या मनात राहाल, सर स्कॉट’, अशा शब्दांत RRR टीमकडून दुःख व्यक्त करण्यात आले.

58 वर्षीय रे स्टीव्हनसन थोर आणि त्याचा सिक्वेल थॉर: द डार्क वर्ल्ड सारख्या अनेक मार्वल चित्रपटांमध्ये दिसला होता, ज्यामध्ये त्याने व्होल्स्टॅगची भूमिका केली होती. भारतीय चित्रपट श्रुष्टी मध्ये त्यांनी फक्त RRR या चित्रपटात काम केले होते. त्यावेळी आपल्या उत्तम खलनायकी भूमिकेतून त्यांनी चांगलीच छाप पाडली.