हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment : RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर अनेक बँकांनी आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे. ज्याचा थेट फायदा आता ग्राहकांना झाला आहे. कारण ज्या लोकांनी सुरक्षेसाठी बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिट्समध्ये (FD) पैसे ठेवले आहेत त्यांना जास्त फायदा मिळत आहे.
हे लक्षात घ्या कि, बँकांव्यतिरिक्त पोस्ट ऑफिस देखील चांगला रिटर्न मिळवण्यासाठी एक चांगला पर्याय ठरत आहे. आता आपल्या मनात असा प्रश्न येत असेल की पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट आणि देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) फिक्स्ड डिपॉझिट्स यांच्यामधील सर्वात चांगला कोणता ??? चला तर मग आज त्याविषयी जणून घेउयात …
SBI FD दर
एका मीडिया रिपोर्ट्सनुसार SBI ने 14 जून 2022 रोजी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी डिपॉझिट्सवरील व्याजदरात बदल केला होता. SBI ने 211 दिवस ते 1 वर्षात मॅच्युअर होणाऱ्या एफडीसाठी 4.40 टक्क्यांवरून 4.60 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. 1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी, 5.10 टक्क्यांवरून 5.30 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. Investment
त्याचप्रमाणे 2 वर्षापासून ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD साठी 5.20 वरून 5.35 टक्के करण्यात आली आहे. जर एखाद्या व्यक्तीने 3 ते 5 वर्षे फिक्स्ड डिपॉझिट्स केली असेल तर त्याला 5.35 टक्के व्याज मिळेल. तसेच 5 वर्षांच्या डिपॉझिट्सवर 5.45 टक्के आणि 10 वर्षांच्या डिपॉझिट्सवर 5.50 टक्के व्याजदर असेल. Investment
ज्येष्ठ नागरिकांसाठी 7 दिवसांपासून ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी 0.50 टक्के अतिरिक्त व्याजदर ऑफर करण्यात आला आहे. याला SBI ची Wecare डिपॉझिट्स स्कीम म्हणतात. याचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 5-10 वर्षांच्या एफडीवर 0.50 टक्के जास्त व्याजासह अतिरिक्त 0.30 टक्के व्याज मिळते. ही योजना 30 सप्टेंबर 2022 पर्यंत सुरू राहणार आहे. Investment
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट
पोस्ट ऑफिसमध्ये ठराविक वेळेसाठी पैसे ठेवण्याच्या योजनेला टाइम डिपॉझिट असे म्हंटले जाते. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट खात्यामध्ये आपल्याला बँकांप्रमाणे एफडी ठेवता येईल. इथे हे लक्षात घ्या कि, पोस्ट विभाग हा भारत सरकारच्या दळणवळण मंत्रालयाद्वारे चालवला जातो, त्यामुळे त्यामध्ये ठेवलेल्या पैशांवर कोणतीही जोखील नसते. Investment
या योजनेअंतर्गत आपल्याला 1 ते 5 वर्षांसाठी टाइम डिपॉझिट खाते उघडता येते. यामध्ये किमान 1000 रुपये ठेवावे लागतात. यामध्ये आपल्याला हवे तितके पैसे जमा करता येतात. पोस्ट ऑफिसमध्ये 1 ते 3 वर्षांसाठी ठेवलेल्या पैशावर 5.5% व्याजदर दिला जातो. जर 5 वर्षे पैसे ठेवले तर 6.7% व्याज मिळेल. याचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे इथे सर्वांना एकसारखेच व्याज दिले जाते. Investment
अधिक माहिती साठी या वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/interest-rates/interest-rates/deposit-rates
हे पण वाचा :
IRCTC खाते आधारशी ऑनलाइन लिंक करण्यासाठीची प्रोसेस समजून घ्या
Gold Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ, नवीन दर पहा
Housing loan : आता LIC हाऊसिंग फायनान्सनेही होम लोन वरील व्याजदरात केली वाढ, नवे दर पहा
Aadhaar Card Update : मोबाईल नंबरशिवाय PVC आधार कार्ड कसे तयार करावे हे जाणून घ्या
Share Market : घसरत्या बाजाराची येत्या आठवड्यात वाटचाल कशी राहील ??? तज्ञांचे मत जाणून घ्या