धक्कादायक ! भरधाव एसटीची दुचाकीला धडक, अपघातात झेडपी शाळेचा शिक्षक ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये भरधाव एसटी बसने धडक दिल्याने दुचाकीस्वार शिक्षक जागीच ठार झाला आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात ही घटना घडली. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास हा भीषण अपघात (Accident) घडला आहे. बारव्हा ते खोलमारा रस्त्यावरील टी-पॉइंट वळणावर एसटी बस आणि दुचाकीमध्ये हा भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातामध्ये कुलदीप गिरधर नारनवरे या शिक्षकाचा मृत्यू झाला. ते गोंदिया जिल्ह्यातील रोसमतोंडी येथील धानोरी इथं राहणारे होते. तसेच ते लाखांदूर तालुक्यातील पारडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सहायक शिक्षक या पदावर कार्यरत होते. नारनवरे आपल्या नातेवाईकांच्या भेटीसाठी जात असताना हा अपघात घडल्यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमका कसा झाला अपघात?
कुलदीप दुचाकीने पारडी येथून तई येथे नातेवाइकाकडे जात होते. त्यावेळी बारव्हा येथून साकोलीकडे जाणाऱ्या एसटी बसने खोलमारा गावातल्या वळणावर भरधाव एसटी बसने दुचाकीला समोरून धडक दिली. हा अपघात (Accident) एवढा भीषण होता कि शिक्षक कुलदीप दुचाकीसह खाली कोसळून गंभीर जखमी झाले.

पत्नी, मुलगी यांचं छत्र हरपलं
या अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. येथे असलेल्या नागरिकांनी गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या कुलदीप नारनवरे यांना बारव्हा आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. शिक्षक कुलदीप यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई-वडील असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गमावल्यानं नारनवरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हे पण वाचा :
सासरच्या जाचाला कंटाळून सांगलीत विवाहितेची आत्महत्या

डिजिटल पेमेंट करण्यासाठी Google Pay शी क्रेडिट कार्ड कसे लिंक करायचे ते जाणून घ्या

ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ खेळाडूचे वन डे क्रिकेटमध्ये तिहेरी शतक, असा पराक्रम करणारा ठरला पहिलाच फलंदाज

BCCI ने घेतलेल्या ‘त्या’ निर्णयामुळे मोहम्मद कैफ झाला इमोशनल

गेल्या 21 दिवसात ‘या’ दोन शेअर्सने दिला 100% नफा !!!

Leave a Comment