Bharat Dal। गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले होते. टोमॅटोच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. त्यातच आता डाळींचे भाव कमी करण्यासाठी सरकारने ठोस पाऊले उचलत एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. त्यानुसार सरकारने आता कमी किमतीत दाळ विक्रीसाठी एक नवीन ब्रँडची डाळ बाजारात उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. या ब्रांड चे नाव भारत दाळ (Bharat Dal) ठेवण्यात आलं असून ही भारत दाळ अवघ्या 60 रुपये किलोने मिळणार आहे.
NAFED मधून करा खरेदी-
सोमवारी केंद्रीय ग्राहक आणि अन्न सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांनी एक निवेदन जारी केलं आहे. या निवेदनात त्यांनी देशात स्वस्त चनाडाळ विक्री करण्यात येणार असून ही डाळ भारत डाळ (Bharat Dal) या नावाने विक्री करण्यात येणार असल्याचं सांगितलं. या डाळीच्या एक किलो पॅक ची किंमत 60 रुपये आणि 30 किलो डाळीच्या पॅकेसाठी 55 रुपये प्रति किलो ठेवण्यात आली आहे. ही चना डाळ दिल्ली एनसीआर येथील राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाच्या (NAFED) मध्ये कमी किमतीत विकली जात आहे.
सर्वसामान्य जनतेला मिळणार दिलासा – (Bharat Dal)
या नवीन उपक्रमाद्वारे केंद्र सरकारकडून चण्याची डाळ तयार करून ग्राहकांना ती कमी किमतीत आणि भारतीय ब्रँडच्या नावाने विकली जाणार आहे. भारतामध्ये सर्वात जास्त प्रमाणात चना डाळ विकली जाते. ही चणादाळ खास करून उत्तर आणि दक्षिण भागातील सर्व राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. त्याचबरोबर आता NCCF केंद्रीय भांडार आणि मदर डेअरी या ठिकाणी देखील ही डाळ विकली जाईल. यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळू शकतो.
काही दिवसांपासून संपूर्ण देशात टोमॅटोच्या किमती गगनाला भिडल्या आहे. अचानक झालेली दरवाढ पाहून केंद्रीय अन्न मंत्रालयाने दिल्ली एनसीआर सह देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये ग्राहकांना कमी किमतीत टोमॅटो उपलब्ध करून दिले होते. या टोमॅटोचा पुरवठा 80 रुपये प्रति किलो दराने करण्यात आला होता.