Satbara Utara : शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार ७/१२ उतारा, बाजारभाव; जमिनीची मोजणीही होणार मोफत, आजच करा हे काम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत हा कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशात बहुतांश लोकांचा व्यवसाय शेती असून अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राचा खूप मोठा वाटा आहे. मात्र असे असले तरी ज्याला आपण जगाचा पोशिंदा म्हणतो अशा शेतकऱ्याची मात्र अनेकदा परवड होताना दिसते. ७/१२ उतारा असो की शेतमालाचे दर यासाठी शेतकऱ्यांचे वारंवार शासकीय कार्यालयात हेलपाटे सुरू असतात. शेतकऱ्यांची ही परवड थांबवून त्यांना त्यांच्या वेळेनुसार सातबारा उतारा, शेतमालाचे दर बाजार भाव, शासनाच्या विविध योजना, जमीन मोजणी आदी माहिती घरबसल्या मिळवायची असेल तर आता कोठेही हेलपाटे मारायची गरज नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर हॅलो कृषी मोबाईल अँप इन्स्टॉल करावं लागणार आहे.

शेकऱ्यांना कायमच शेतमालाचे भाव, शासनाच्या शेतकऱ्यांसाठीच्या योजनांवर अवलंबून राहावे लागते. मात्र योजना आल्या कधी आणि त्याची मुदत संपली कधी हे बऱ्याचदा शेतकऱ्यांना समजत नाही. अनेकदा माहिती असूनही काही शासकीय कर्मचाऱ्यांकडून ते सांगितलेही जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागते. शेतमालाचे भाव, सातबारा उतारा, शासकीय योजना, कृषिविषयक बातम्या, भू नकाशा या महत्त्वाच्या बाबींच्या भोवती शेतकन्याची धावपळ सुरू असते. हे सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी शेतकऱ्यांना नेहमीच शासकीय कार्यालयासह महा ई-सेवा केंद्राचा आधार घ्यावा लागतो. शेतकऱ्याची ही परवड Hello Krushi या मोबाईल अँपमुळे आता थांबली आहे.

हॅलो कृषी मोबाईल अँप कसं डाउनलोड करावं?

शेतकरी मित्रांनो हॅलो कृषी अँप शेतकर्यांनमध्ये प्रचंड लोकप्रिय होत असून महाराष्ट्रभरातील शेतकरी या अँपचा वापर करत आहेत. हे अँप डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला आम्ही काही दिलेल्या स्टेप्स फॉलोअ करायच्या आहेत.
१) सर्वात अगोदर तुमच्या मोबाईल फोन मधील गुगल प्ले स्टोअर ओपन करा आणि त्यामध्ये Hello Krushi असं सर्च करा.
२) यानंतर तुम्हाला हिरव्या रंगाचा लोगो असणारे Hello Krushi अँप दिसेल. तिथे क्लिक करून अँप Download करून घ्या.
३) आता तुमचा मोबाईल नंबर आणि गाव, तालुका आदी माहिती भरून मोफत रजिस्ट्रेशन करा.

जमीन मोजणीही होते मोफत

विशेष बाब म्हणजे या अँपच्या मदतीने शेतकरी आपली जमीन १ रुपयाही खर्च न करता अगदी सहज मोजू शकतात. तसेच शेताला कुंपण करायचे असल्यास किंवा काही लागवड करायची असल्यास शेतात किती रोपे बसतील याचा अंदाज घ्यायचा असेल तर काही मिनिटांत शेतकरी हॅलो कृषी मोबाईल अँपच्या माध्यमातून आपली जमिन मोजून त्यानुसार रोपवाटिकेतून तितकीच रोपे आणू शकतात. तसेच बांधाबांधावरील वाद आपापसात मिटवून शेतकरी जमीन मोजणी करू शकतात.

जमीन खरेदी विक्री, जनावरे खरेदी विक्रीचीही सोय

शेतकऱ्यांना हॅलो कृषी मोबाईल अँपच्या साहाय्याने आपल्या जमिनीची, जनावरांची विक्री कोणाही एजंटशिवाय थेट करता येते. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असून हॅलो कृषी अँप शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.