“महाविकास आघाडी सरकारचे जनतेच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या पाच राज्यांच्या निवडणुका काल पार पाडल्या. या निवडणुकीतमहाविकास आघाडी सरकारला काही पराभवाचा सामना करावा लागला. तरीही आघाडी सरकारमधील नेत्यांकडून भाजपवर टीका केली जात असल्याने यावरून केंद्रीयमंत्री डॉ. भरती पवार यांनी आघाडी सरकारवर घाणघाती टीका केली. आजही राज्यात अनेक प्रश्न आहेत. त्यांकडे महाविकास आघाडी सरकारचे दुर्लक्ष आहे. या प्रश्नामुळेच जनता या सरकारला नक्की नाकारेल. जनतेची प्रश्न दूर करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका पवार यांनी केली.

डॉ. भरती पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारण हल्लाबोल केला. यावेळी त्या म्हणाल्या की, जनतेच्या प्रश्नांकडे महाविकास आघाडी सरकार दुर्लक्ष करत असल्याने आगामी काळात या सरकारला पाडण्यासाठी आमचा कुठलाही सहभाग राहणार नाही. हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सांगितले आहे. मात्र, राज्यातील शेतकऱ्यांचे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलनात आमचे कार्यकर्ते मागे हटणार नाहीत. पाच राज्यांच्या निवडणुकीत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या चार राज्यांमधील विजय दिन आमच्यासाठी आनंदाचा, उत्साहाचा व ऐतिहासिक आहे.

काल उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या राज्यांच्या निवडणुका पार पडल्या. या ठिकाणी या चार ही राज्यातील नागरिकांनी पुन्हा पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला. चारही राज्यातील मुख्यमंत्र्यांची विकास कामे असल्यामुळे पुन्हा जनतेने हा निकाल देऊन स्पष्ट केले आहे, असे पवार यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment