भास्कर जाधव म्हणजे सत्तेची चटक लागलेला माणूस : नवाब मलिक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी |  शिवसेनेत गेलेलेगुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर राष्ट्रवादीच काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी चांगलेच तोंडसुख घेतला. भास्कर जाधव हा सत्तेची चटक लागलेला माणूस आहे. त्यामुळे ते शि‍वसेनेत गेले आहे. परंतु येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार त्यांचा पराभव करून याचा बदला घेईल असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवारानेच जाधव शिवसेनेत असताना त्यांचा पराभव केला होता. पराभव झाल्यावर ते राष्ट्रवादीत आले.

त्यानंतर त्यांना विधानपरिषदेवर घेण्यात आले. विधानसभा देण्यात आली. मंत्री करण्यात आले. परंतु आता ते सत्तेसाठी शिवसेनेत गेले आहेत. भास्कर जाधव हे सत्तेशिवाय राहू शकत नाही, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. “येत्या निवडणुकीत त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस दमदार उमेदवार देईल आणि त्यांचा पराभव करेल, असा विश्वासही नवाब मलिक यांनी यावेळी व्यक्त केला. देशातील आणि राज्यातील सरकारे आम्ही केलेल्या कामांची उद्घाटने करत विकासकामांचा डंका पिटत असल्याची जोरदार टीका नवाब मलिक यांनी केली आहे. निवडणुका जवळ आल्यावर केंद्र व राज्य सरकार मोठमोठया जाहिराती आणि विकासकामांची उद्घाटने करत आहे आणि विकास आम्हीच करत आहे असे सांगत आहे याचा जोरदार समाचार नवाब मलिक यांनी घेतला.

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी महाराष्ट्रात सर्वाधिक विकासकामे केली जात असल्याच्या दाव्यावर बोलताना नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर दिले. पियुष गोयल हे मुंबईचे आहेत. पावसामध्ये रेल्वेची काय हालत झाली होती याचा अनुभव मुंबईकरांनी घेतला आहे. पियुष गोयल महाराष्ट्रात ४० टक्के विकास होत असल्याचे बोलत आहेत. परंतु ट्विटर, सोशल मिडिया यावरुन सरकार किंवा व्यवस्था चालवली जात नाही हे लक्षात घ्या, असेही नवाब मलिक यांनी म्हटले.