हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । भारतीय चलनी नोटांवर कुणाचा फोटो असावा? यावरून नवा वाद सुरु झाला आहे. अनेक राजकीय नेत्यांनी याप्रकरणी आपलं मत व्यक्त करताना छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोचा पर्याय दिला. त्याच दरम्यान, 25 पैशाच्या नाण्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा एडिट केलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याबाबत राणेंचे कट्टर राजकीय विरोधक आणि ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव याना विचारलं असता त्यानी फोटो एडिट करणाऱ्याचे कौतुक केलं आहे.
नोटांवर कोणाचा फोटो असावा यावरून वाद सुरु असतानाच सोशल मीडियावर एका अज्ञात व्यक्तीने 25 पैशांच्या नाण्यावर नारायण राणेंचा फोटो एडिट केला होता आणि ‘हे नाणं फायनल करा’ अशी मागणी त्याने केली. यावरून भास्कर जाधव यांना विचारलं असता ज्याला कुणाला ही कल्पना सुचली असेल त्याच्या कल्पकतेला दाद दिली पाहिजे, असं म्हणत त्यांनी त्या व्यक्तीचे कौतुकच केलं.
कंगनाची राजकारणात एन्ट्री? भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/xWXRmCLjJT#hellomaharashtra @BJP4Maharashtra
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 30, 2022
दरम्यान, 25 पैशांच्या नाण्यावर राणेंचा फोटो व्हायरल झाल्यानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं. भाजपने संबंधित अज्ञात तरुणाविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तर दुरीकडे शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी मात्र राणेंची किंमत 25 पैसेच आहे असं म्हणत टीका केली होती.