टीम हॅलो महाराष्ट्र | १ जानेवारी २०१८ साली पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा येथे झालेली दंगल ही भाजप पुरस्कृत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. राज्याची पोलीस यंत्रणा वापरत ही दंगल घडवून आणल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. कोरेगाव-भीमा येथील दंगलीत राहुल फटांगळे या युवकाला आपला जीव गमवावा लागला होता.
या आरोपावर उत्तर देताना सुधीर मुनगंटीवार यांनी तत्कालीन सरकार हे भाजप-शिवसेनेचं होतं असं सांगत गृहमंत्रीपद जरी देवेंद्र फडणवीसांकडे असलं तरी गृहराज्यमंत्रीपदी शिवसेनेचे दीपक केसरकर होते हे स्पष्टीकरण दिलं आहे.
दरम्यान या दंगलीच्या एसआयटी चौकशीची मागणी शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या मागणीला उद्धव ठाकरे काय उत्तर देणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.
ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”
हे पण वाचा-
रतन टाटांच्या इन्स्टाग्राम पोस्टवर लाईक्सचा पाऊस; तरुणपणातील फोटोने घातला चांगलाच धुमाकूळ
#Budget2020: पीएफच्या (PF) नियमात होऊ शकतो मोठा बदल ! ‘या’ लोकांना होईल फायदा