अभिनेत्रीचा मास्क न लावता आमदारासोबत डान्स; पहा व्हिडिओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – देशभरात कोरोनानं अक्षरश: थैमान घातलं आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात तर रुग्णांची आकडेवारी हजारोंच्या संख्येनं वाढताना दिसत आहे. इतक्या लोकांना देण्यासाठी लसींचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी कोरोनाची ही वाढती साखळी तोडण्यासाठी सरकारनं लॉकडाउनचा पर्याय स्विकारला. मात्र काही मंडळी या निर्बंधांकडं दुर्लक्ष करुन घराबाहेर पडताना दिसत आहेत.

असाच काहीसा प्रकार प्रसिद्ध अभिनेत्री अक्षरा सिंह हिनं केला. ती तर चक्क मास्क न लावता एका माजी आमदारासोबत नाचताना दिसली. परिणामी तिच्याविरोधात आता पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधील माजी आमदार मुन्ना शुक्ला यांनी आपल्या घरी एका खास कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात अक्षरानं देखील हजेरी लावली होती. तिनं कार्यक्रमात जबरदस्त डान्स केला. तिच्यासोबत स्वत: मुन्ना शुक्ला आणि त्यांचे कार्यकर्ता देखील थिरकले. या नाईट पार्टीचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये काही पोलीस देखील नाचताना दिसत आहे.

सगळ्यांना मार्गदर्शक सूचनांचा विसर पडला
या कर्यक्रमात मुन्ना शुक्ला आणि त्यांच्या पत्नीने जोरदार नृत्य केले. या ठिकाणी शेकडो लोक जमा झाले होते. यामध्ये कित्येक हिंदी आणि भोजपुरी गाणी लावण्यात आली त्या नादात सगळे कोरोना विसरून गेले.

https://twitter.com/patrakarajeetkr/status/1386169043506262018

बॉडीगार्ड कार्बाईनने केला गोळीबार
फक्त एवढेच नाही तर बाहुबली नेत्याच्या अंगरक्षकाने सर्व मर्यादा ओलांडत पोलिसांच्या गणवेशात कार्बाईनवरून गोळीबार केला. महत्वाची बाब म्हणजे या व्हिडिओमध्ये बहुतेक लोकांनी मुखवटे घातलेले नाही आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.