गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र पटेल यांची निवड; भाजपच्या बैठकीत निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी अचानकपणे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्रीपदी नक्की कोणाची वर्णी लागणार यावर भाजपची बैठक सुरू होती. अखेर भुपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून ते गुजरातचे नवे मुख्यमंत्री होतील.

नव्या मुख्यमंत्र्याची निवड करण्यासाठी भाजपच्या विधिमंडळ सदस्यांची आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भूपेंद्र पटे यांच्या नावावर सर्वांचे एकमत झाले. गांधीनगरमध्ये भाजप कार्यालायात ही बैठक आयोजित आली होती.

कोण आहेत भुपेंद्र पटेल-

भूपेंद्र पटेल हे घरलोदिया येथून आमदार आहेत आणि माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या जवळचे समजले जातात. भूपेंद्र पटेल यांनी अहमदाबाद महापालिकेच्या स्थायी समितीचं सभापती म्हणून देखील काम पाहिलं आहे. भूपेंद्र पटेल हे शहरी भागातून येतात.

You might also like