केंद्राचा मोठा निर्णय!! बेरोजगारांना मिळणार ‘या’ योजनेचा लाभ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील बेरोजगारांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ईएसआयसी) ‘अटल बीमित व्याक्ती कल्याण योजनेची’ मुदत 30 जून 2022 पर्यंत वाढवली आहे. या योजनेअंतर्गत औद्योगिक कामगारांना बेरोजगारी भत्ता दिला जातो

अटल बिमीत कल्याण कल्याण योजनेअंतर्गत, नोकरी गमावलेल्या संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सरकारकडून आर्थिक मदत मिळते. हा एक प्रकारचा बेरोजगारी भत्ता आहे, ज्याचा लाभ फक्त त्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध आहे जे ईएसआय योजनेअंतर्गत येतात. म्हणजेच इएसआय (ESI) योगदान त्यांच्या मासिक पगारातून कापले जाते. योजनेअंतर्गत, बेरोजगार झाल्यानंतर, सरकारकडून जास्तीत जास्त 90 दिवस म्हणजे तीन महिने आर्थिक मदत दिली जाईल.

केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) 185 व्या बैठकीत अटल बिमीत कल्याण कल्याण योजना जून 2022 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. ABVKY चा लाभ ज्यांनी नोकरी गमावली आहे त्यांना मिळेल.

You might also like