हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्यानंतर आता होळकर घराण्याच्या वंशजांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. शरद पवार या सगळ्याच्या माध्यमातून राजकारण करु पाहत असल्याचा आरोप भूषण राजे होळकर यांनी केला. तसेच शरद पवारांना माँसाहेबच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्याचा कोणताही नैतीक अधिकार नाही असंही ते म्हणाले.
जेजुरी गडावरील राजमाता अहिल्या देवी यांच्या पुतळ्याचे शनिवारी शरद पवार यांच्या हस्ते अनावरण होणार होते. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता होळकर घराण्याचे वंशज असलेल्या भूषण राजे होळकर यांनी शरद पवार यांना लक्ष्य केले. तसेच छत्रपती संभाजीराजे भोसले यांनीही या सोहळ्याला उपस्थित राहू नये, असा संदेश भूषण राजे होळकर यांनी दिला आहे. जेजुरी गडावरील राजमाता अहिल्या देवी यांच्या पुतळ्यांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमातून शरद पवार यांच्याकडून राजकारण होत आहे. छत्रपती घराणे सर्व समाजाचे भल्याचा विचार करणारे असल्याने छत्रपती संभाजी राजेंना या कार्यक्रमाला न जाण्याची विनंती केल्याचे भूषण राजे होळकर यांनी बोलताना सांगितले.
बहुजनांच्या प्रश्नांना बगल देण्यासाठी पुतळ्याच्या माध्यमातून राजकारण होतंय ते होऊ नये यासाठी आपण या कार्यक्रमास उपस्थित राहु नये अशी विनंती त्यांनी छत्रपती संभाजी राजे यांना केली आहे. मूळ बहुजन समाजाचे प्रश्न बाजूला राहतायेत आणि समाजा मध्ये दुही पसरवण्यासाठी शरद पवार यांच्या माध्यमातून या पुतळ्याच्या माध्यमातून राजकारण होताना दिसत आहे असा आरोप त्यांनी केला.
यावेळी त्यांनी गोपीचंद पडळकर यांचे कौतुक केले. शरद पवार जातीपाती मध्ये तेढ निर्माण करतात आणि आजपर्यंत त्यांनी कोणत्याही समाजाचे प्रश्न सोडवले नाहीत. त्यामुळे शरद पवारांना माँसाहेबच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्याचा कोणताही नैतीक अधिकार नाही त्यामुळे पडळकर जे बोलले त्याच आम्ही समर्थन करतो असंही भूषण राजे होळकर यांनी म्हंटल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’