हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD – RBI कडून रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या FD वरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. जर आपल्यालाही FD मध्ये पैसे गुंतवायचे असतील तर सर्व बँकांच्या व्याजदराची माहिती घ्या …

PNB : या बँकेने एक वर्षाच्या FD वरील व्याज 0.20 टक्क्यांनी वाढवले आहे. ते आता 5.50 टक्के झाले आहे. तसेच एक ते दोन वर्षांच्या एफडीवर बँकेकडून 0.15 टक्के ते 5.5 टक्के व्याज दिले जात आहे तर दोन ते तीन वर्षांच्या एफडीवर 5.60 टक्के व्याज देण्यात येत आहे. Bank FD

Indusind Bank : या बँकेने7 ते 14 दिवसांच्या एफडीवर 0.75 टक्के ते 3.50 टक्के, 15 ते 30 दिवसांच्या एफडीवर 0.50 टक्के ते 3.50 टक्के, 31 ते 45 दिवसांच्या एफडीवर 0.50 टक्के ते 4 टक्के, 46 ते 60 दिवसांच्या एफडीवर 4 टक्के, पाच वर्षांच्या एफडीवर 6.75 टक्के व्याजदर करण्यात आला आहे. Bank FD

Kotak Mahindra Bank : या बँकेने 365 दिवसांपासून 389 दिवसांपर्यंतच्या FD वरील व्याजदर 0.15 टक्क्यांनी वाढवून 5.75 टक्के केला आहे. तसेच 390 दिवसांपासून ते तीन वर्षांपर्यंत FD वरील व्याजदर 0.15 टक्क्यांनी वाढवून 5.90 टक्के करण्यात आला आहे. Bank FD
SBI : या बँकेच्या 180 दिवसांपासून 210 दिवसांपर्यंतच्या FD वरील व्याजदर 0.15 टक्क्यांनी वाढवून 4.40 टक्क्यांवरून 4.55 टक्के करण्यात आला आहे. तसेच एक ते दोन वर्षांच्या एफडीवरील व्याजही 0.15 टक्क्यांनी वाढवून 5.45 टक्के करण्यात आला आहे. Bank FD

HDFC Bank : या बँकेच्या एक ते दोन वर्षांच्या FD वरील व्याज 0.15 टक्क्यांनी वाढून 5.50 टक्के झाले आहे. तसेच तीन ते पाच वर्षांच्या एफडीवरील व्याज 0.40 टक्क्यांनी वाढून 6.10 टक्के झाले आहे. Bank FD

Canara Bank : या बँकेच्या FD वर 180 दिवसांपासून 269 दिवसांपर्यंतचे व्याज 0.15 टक्क्यांनी वाढून 4.65 टक्के झाले आहे. तसेच 270 दिवसांपासून ते एक वर्षाच्या FD वरील व्याजदर 0.10 टक्क्यांनी वाढून 4.65 टक्के झाले आहे. त्याचबरोबर एका वर्षाच्या एफडीवरील व्याज 0.20 टक्क्यांनी वाढून 5.50 टक्के झाले आहे. एक ते दोन वर्षांच्या एफडीवर 0.15 टक्क्यांनी वाढ करून 5.55 टक्के करण्यात आले आहे. Bank FD
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.hdfcbank.com/personal/resources/rates
हे पण वाचा :
PNB कडून ग्राहकांना 31 ऑगस्टपर्यंत KYC करण्याचे आवाहन अन्यथा बंद होईल खाते !!!
HDFC Bank ने देखील FD वरील व्याजदरात केली वाढ !!! नवीन दर तपासा
Gold Price Today : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त !!!
Bank FD : आता ‘या’ 2 बँकांनी आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात केली वाढ, नवे दर पहा




