नवी दिल्ली । बस आणि मेट्रो ट्रेनमध्ये महिलांसाठी स्वतंत्र जागा राखीव आहेत. दिल्ली मेट्रो ट्रेनमध्ये प्रत्येक डब्यात महिलांसाठी जागा राखीव ठेवण्यासोबतच एक वेगळा डबाही आरक्षित करण्यात आला आहे. ईएमयू आणि डीएमयू ट्रेनमध्ये महिलांसाठी स्वतंत्र डबे आहेत. आता रेल्वेतील महिला प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील महिला प्रवाशांसाठी स्पेशल बर्थ बनवले आहेत.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की,” लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील महिला प्रवाशांचा आरामदायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी, भारतीय रेल्वेने स्पेशल बर्थच्या वाटपासह अनेक सुविधा सुरू केल्या आहेत.”
मेल आणि एक्सप्रेस ट्रेनच्या स्लीपर क्लासमध्ये सहा बर्थ
केंद्रीय मंत्री म्हणाले की,”लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमध्ये स्लीपर क्लासमध्ये सहा बर्थचा आरक्षण कोटा आणि गरीब रथ, राजधानी, दुरंतो यासह पूर्ण वातानुकूलित एक्स्प्रेस गाड्यांचा थर्ड एसी कोच (3AC class) मध्ये सहा बर्थचा आरक्षण कोटा महिला प्रवाशांसाठी निश्चित करण्यात आला आहे.
याशिवाय, प्रत्येक स्लीपर कोचमध्ये सहा ते सात लोअर बर्थ, वातानुकूलित 3 टियर (3AC) कोचमध्ये चार ते पाच लोअर बर्थ आणि वातानुकूलित 2 टियर (2AC) कोचमध्ये तीन ते चार लोअर बर्थ ज्येष्ठ नागरिकांसाठी, 45 वर्षे आणि त्यावरील महिला प्रवासी आणि गर्भवती महिला यांच्यासाठी निर्धारित केले गेले आहे. हे आरक्षण ट्रेनमधील त्या वर्गाच्या डब्यांच्या संख्येवर आधारित असेल.
महिला प्रवाशांची सुरक्षा
रेल्वे मंत्र्यांनी सांगितले की, ट्रेनमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठीही खास व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांनी माहिती दिली की भारतीय राज्यघटनेच्या सातव्या अनुसूची अंतर्गत ‘पोलीस’ आणि ‘सार्वजनिक सुव्यवस्था’ हे राज्याचे विषय आहेत. मात्र, रेल्वे संरक्षण दल (RPF), GRP आणि जिल्हा पोलिस प्रवाशांना चांगली सुरक्षा देतील.
या सर्व सुविधांव्यतिरिक्त, रेल्वे आणि स्थानकांवर महिला प्रवाशांसह इतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी जीआरपीच्या समन्वयाने रेल्वेकडून आणखी काही पावलेउचलली जात आहेत.रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने गेल्या वर्षी 17 ऑक्टोबर रोजी संपूर्ण भारतातील “मेरी सहेली” उपक्रम सुरू केला होता, ज्याच्या उद्देशाने महिला प्रवाशांना त्यांच्या संपूर्ण प्रवासात रेल्वेने प्रवास करायचा होता.