भुसावळ । माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलू लागली असून भाजपला पहिला धक्का बसला आहे. अशातच भुसावळचे भाजप आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसाच्या फलकावर एकनाथ खडसे यांचा फोटो झळकल्याने आमदार सावकारे देखील लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.
आमदार संजय सावकारेंचा आज शुक्रवारी वाढदिवस साजरा होत आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या समर्थकांकडून भुसावळ शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या फलकावरुन भाजपच्या नेत्यांची छायाचित्रे वगळण्यात आली आहेत. भाजपच्या नेत्यांसह गिरीश महाजन यांचेही छायाचित्र जाहिरातींमधून वगळण्यात आले आहे.सोशल मीडियावरील अनेक जाहिरातींमध्ये सावकारेंसोबत एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसे यांची छायाचित्रे आहेत. काही फलकाववर भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांचे छायाचित्र आहे. त्यामुळे सावकारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे.
भाजप आमदार संजय सावकारे एकनाथ खडसे यांचे कट्टर समर्थक राहीले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांना खडसेंनीच राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपत आणले होते. एकनाथ खडसे यांनी दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर खडसेंच्या अनेक समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तर काहींनी पक्षांतराच्या अडचणी येऊ नये म्हणून आपल्या पदाची टर्म झाल्यानंतर त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच खडसेंचे समर्थक म्हणून ओळख असलेल्या आमदार संजय सावकारे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची चर्चा सुरू आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघात एकनाथ खडसे यांचे कायम वर्चस्व राहीले आहे. यातील भुसावळ विधानसभा एकेकाळी राष्ट्रवादीकडे होता. त्यानंतर आमदार संजय सावकारे यांनी राष्ट्रवादीला सोडून भाजपत प्रवेश करून आमदारकीत विजय मिळवला. आता खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्याने सावकारे आपली टर्म भाजपतच पूर्ण करतात की याबाबत जिल्ह्यात उत्सुकता लागून राहीली आहे. (BJP Bhusawal MLA Sanjay Savkare puts Eknath Khadse photo on birthday poster)
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’