हॅलो महाराष्ट्र । आधार कार्ड हे आज प्रत्येक नागरिकासाठी एक आवश्यक असे डॉक्युमेंट बनलेले आहे. याशिवाय आपल्याला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळू शकत नाही आणि त्याशिवाय आपली ओळख देखील अपूर्ण मानली जाते. पूर्वी आधार कार्ड एका कागदावर बनवले जात असे. ज्याला बर्याचदा खूप सांभाळून ठेवावं लागायचं. तसंच बर्याच वेळा ते गहाळ होण्याची भीतीही लोकांमध्ये असायची. परंतु आता असे होणार नाही, कारण UIDAI ने आधार कार्ड पॉलिव्हिनाइल क्लोराईड कार्ड (PVC) वर पुन्हा छापण्याची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. UIDAI ने एका ट्वीटमध्ये ही माहिती दिली. हे कार्ड एटीएम किंवा डेबिट कार्डासारखे अगदी सहज पणेआपल्या वॉलेट मध्ये येईल. जेणेकरून ते लवकर खराब होण्याची चिंता राहणार नाही.
ट्विटमध्ये काय आहे?
UIDAI च्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, PVC कार्डवर आधार कार्ड छापता येईल. हे टिकाऊ आहे तसेच दिसायलाही ते आकर्षक आहे आणि लेटेस्ट सिक्योरिटी फीचर्सने देखील सुसज्ज आहे. या सिक्योरिटी फीचर्स मध्ये होलोग्राम, गिलोच पॅटर्न, घोस्ट इमेज आणि मायक्रोटेक्स याचा समावेश असेल.
#AadhaarInYourWallet
You can now order the all-new Aadhaar PVC card, which is durable, looks attractive, and has the latest security features. Its security features include a hologram, Guilloche Pattern, ghost image & Microtext. To order, click https://t.co/TVsl6Xh1cX pic.twitter.com/FTNbOa5wE3— Aadhaar (@UIDAI) October 10, 2020
PVC वर प्रिंट करण्यासाठी फी द्यावी लागेल
PVC कार्डांवर आधार प्रिंट करण्यासाठी तुम्हाला 50 रुपये फी द्यावी लागेल. PVC कार्ड हे एक प्रकारचे प्लास्टिक कार्ड आहे. एटीएम कार्ड, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड्समध्येही त्याचा वापर केला जातो.
PVC आधार कार्ड कसे बनवायचे?
यासाठी UIDAI च्या वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला My Aadhaar’ सेक्शनमध्ये जा आणि ‘Order Aadhaar PVC Card’ वर क्लिक करावे लागेल. यानंतर, आपल्याला आपला 12 अंकी क्रमांक किंवा 16 अंकी व्हर्च्युअल आयडी किंवा 28 अंकी आधारचा आधार एनरोलमेंट आयडी (EID) भरावा लागेल. यानंतर, आपल्याला सिक्योरिटी कोड किंवा आपल्याला कॅप्चा भरावा लागेल. त्यानंतर Send OTP चा ऑप्शन एक्टिव होईल. तेथे आपल्याला क्लिक करावे लागेल आणि OTP आपल्या रजिस्टर्ड मोबाइलवर प्राप्त होईल, जिथून आपल्याला ते OTP वाल्या सेक्शनमध्ये जावे लागेल. यानंतर आपण ऑनलाईन फॉर्म सबमिट करू शकता.
या संपूर्ण प्रक्रियेनंतर आपल्या समोरच्या स्क्रीनवर PVC आधार कार्डाचे प्रीव्यू असेल तर त्या खाली पेमेंटचा पर्यायही दिसेल. त्यावर क्लिक करून, आपण पेमेंट मोडमध्ये जा. ज्याद्वारे तुम्हाला 50 रुपये फी भरावी लागेल. यानंतर, आपल्या आधार PVC कार्डची ऑर्डर प्रक्रिया पूर्ण होईल. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, UIDAI आधार प्रिंट करेल आणि 5 दिवसात भारतीय पोस्ट डिलिव्हरी करेल. यानंतर, पोस्टल विभाग स्पीड पोस्टच्या माध्यमातून आपल्या घरात पोहोचवेल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.