हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या संचारबंदीमुळे एमपीएससी ची नियोजित परीक्षा रद्द करण्यात आली होती. मात्र परीक्षांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका तयार होत्या. या तयार असणाऱ्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका ज्या प्रत्येक जिल्ह्यातील कोषागार कार्यालयात आहेत. त्या आता सुरक्षा कक्षात ठेवण्याची विनंती करीत २१ ऑक्टोबर पर्यंत त्या सुरक्षित ठेवण्यासाठीची मुदतवाढ एमपीएससीच्या सहसचिवांनी संबंधित जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे आहे. त्यामुळे आता राज्यातील एमपीएससीच्या परीक्षा या २१ ऑक्टोबर आधीच होतील याची निश्चिती झाली आहे.
५ एप्रिल ला एमपीएससीची परीक्षा होणार होती. मात्र संचारबंदीमुळे ती रद्द करण्यात आली. उत्तरपत्रिका व प्रश्नपत्रिका या कोषागार कार्यालयात सुरक्षित ठेवण्यासाठी ३१ एप्रिल पर्यंतची मुदतवाढ मागण्यात आली होती. मात्र संचारबंदी लांबल्यामुळे आता परीक्षाही पुढे गेल्या असल्याने आता एमपीएससीच्या सहसचिवांनी २१ ऑक्टोबर पर्यंत तयार असणाऱ्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका या सुरक्षा कक्षात ठेवाव्यात यासाठी मुदतवाढ मागितली असून तसे त्यांनी पत्र संबंधित निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविले आहे. दरम्यान राज्यातील साधारण २ लाखाहून अधिक विद्यार्थी या परीक्षेची तयारी करीत आहेत. बरेच जण आपले मुळगाव सोडून एमपीएससीसाठी म्हणून मोठ्या शहरात येत असतात. अशा अनेक विद्यार्थ्यांची निराशा परीक्षा पुढे गेल्याने झाली आहे. तसेच यूपीएससीने देखील त्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर आता एमपीएससीने २१ ऑक्टोबर पूर्वी परीक्षा घेण्याचे नियोजन केले असून पुढील १५ दिवसात ते वेळापत्रक जाहीर करणार आहेत.अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान मागच्या वर्षी उत्पादन शुल्क विभागाच्या ३३ उपनिरीक्षक, १७९ लिपीक टंकलेखक, १२६ कर सहाय्यक, १६ विद्युत अभियांत्रिकी सेवा आणि १ हजार १४६ स्थापत्य अभियांत्रिकी सेवा या पदांसाठी परीक्षा झाली होती. ज्याचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या पाठपुराव्याच्या पार्श्वभूमीवर जुलै ऑगस्ट पर्यंत निकाल जाहीर करण्याचे नियोजन असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान सामाजिक अलगावचे नियम पाळून परीक्षा घेतल्या जाणार असून गरज पडल्यास परीक्षा केंद्रे बदलण्याची तयारीही दाखविण्यात आली आहे. राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आणि पोलीस उपनिरीक्षक पदांच्या परीक्षा होणार आहेत. तसेच आता प्रलंबित निकाल ही लवकरच जाहीर केले जाणार आहेत. अशी माहिती समोर आली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.