मुंबईत मोठा रेल्वे अपघात! 2 एक्स्प्रेस गाड्यांची धडक; 3 डबे घसरले

0
217
Mumbai Railway Accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | मुंबईतील मध्य रेल्वेवरील दादर आणि माटुंगा रेल्वे स्थानकांदरम्यान मोठा रेल्वे अपघात झाला. एकाच रेल्वे ट्रॅकवर दोन एक्स्प्रेस गाड्या समोरासमोर आल्यानंतर मागून आलेल्या गदग एक्स्प्रेसचं इंजिन दादर-पद्दुचेरी एक्स्प्रेसला धडकले. त्यामुळं एक्स्प्रेसच्या मागील बाजूचे तीन डबे रुळांवरून घसरले.  हा अपघात एवढा भीषण होता की दोन ते तीन वेळा शॉर्ट सर्किट झालं. यामुळं मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गदग एक्स्प्रेस ही गाडी नियमित वेळापत्रकानुसार साडे नऊ वाजण्याच्या सुमारास सीएसएमटी येथून निघाली. याच वेळेस दादर ते पुद्दुचेरी चालुक्य एक्स्प्रेस दादर फलाट क्रमांक सात वरून रवाना झाली. या दोन्ही गाड्या जलद मार्गावरून आपल्या गंतव्य स्थानकांसाठी रवाना होणार होत्या. मात्र ट्रॅक न बदलल्यामुळे गदग एक्स्प्रेसही पुद्दुचेरी एक्स्प्रेसच्या रुळांवर आली, त्यामुळे दोन्ही गाड्यांचे अनेक डबे एकमेकांवर आदळले. मात्र, दोन्ही गाड्यांचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान घटनास्थळी अभियांत्रिकी पथक दाखल झाले. या अपघातामुळं मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील आणि एक्स्प्रेस गाड्या पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आल्या. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यानं CSMT स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here