शरद पवारांना मोठा धक्का; महाराष्ट्र कूस्तीगीर परिषद बरखास्त

0
49
Sharad Pawar Sad
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याना दुसरा मोठा धक्का बसला आहे. भारतीय कुस्ती महासंघाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त केली आहे. महाराष्ट्र कुस्तिगीर परिषदेवर गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार यांचे वर्चस्व आहे. दरम्यान, या वर्चस्वाला धक्का देताना भारतीय कुस्ती संघटनेकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.

भारतीय कुस्ती संघटनेच्या काही प्रस्तावांना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. तसेच राज्यातील मल्लांकडूनही राज्य कुस्तीगीर परिषदेबाबत तक्रारी आल्या होत्या. 15 वर्षाखालील गटासाठी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यास महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, असं पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. देशात हरियाणा नंतर कुस्ती मध्ये महाराष्ट्राचे नाव घेतलं जात, पण संघटना काहीच काम करत नसेल तर कस चालेल असा सवाल महासंघाच्या सचिवांनी केला.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद अचानकपणे बरखास्त केल्याचे वृत्त कळाले, तकलादु कारण देऊन जर परिषद बरखास्त केल्या गेली असेल तर या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here