बिहार विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोग आज तारखा घोषित करणार

नवी दिल्ली । निवडणूक आयोगाकडून आज दुपारी 12.30 वाजता दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी तारखा घोषित होणार आहेत. बिहार विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबरला संपतो आहे. त्यामुळं नवीन सरकार हा कार्यकाळ संपण्याआधी स्थापन होणं गरजेचं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या विधानसभा निवडणुका यावेळी तीन ते चार टप्प्यात होण्याची शक्यता आहे. 2015 मध्ये या निवडणुका पाच टप्प्यात झाल्या होत्या. गेल्यावेळी निवडणुकांमध्ये 72 हजार पोलिंग बूथ होते, मात्र यावेळी निवडणूक आयोगाने जवळपास एक लाख सहा हजार बूथ बनवण्याची तयारी केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने आयोगाला पूर्ण काळजी घेऊन या निवडणुका पार पाडायच्या आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी एक लाख 80 हजारहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

दरम्यान, बिहार विधानसभेत सोबत आज मध्यप्रदेश मधल्या पोटनिवडणुकाही जाहीर होण्याची शक्यता आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बंडानंतर जवळपास 27 जागांवर निवडणुका अपेक्षित आहेत. मध्यप्रदेशसाठी ही मिनी विधानसभा असणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

 

You might also like