Bihar Election Result 2020: मोदींच्या हनुमानाचा जेडीयूला दणका! चिराग पासवान नितीश कुमारांना बुडवणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटणा । बिहार निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल (Bihar Vidhansabha Election Result) अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहेत. सुरुवातीच्या कलांनुसार राजदला (RJD) शंभरपेक्षा अधिक जागांवर आघाडी मिळाली आहे, तर नितीश कुमार (Nitish Kumar) यांचा जेडीयू (JDU) तिसऱ्या क्रमांकावर फेकला जाण्याची चिन्हं आहेत. एन

बिहार निवडणुकीत लोक जनशक्ती पक्षाची (LJP) भूमिका काय, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लोजपचे अध्यक्ष चिराग पासवान (Chirag Paswan) यांनी एनडीएतून बाहेर पडत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा दिला होता. मात्र, बाहेर पडतान चिराग यांनी मोदींचे असल्याचे सांगत नितीश कुमारांना थेट जेलमध्ये धाडण्याची भाषा केली होती. त्यामुळं लोक जनशक्ती पक्ष हा भाजपची ‘बी’ टीम असल्याच्या चर्चेला जागा मिळाली असताना लोजपने भाजपसोबत वैर नसल्याचे सांगत केवळ जेडीयूविरोधात उमेदवार उभे केले होते. त्यामुळे लोजप-जेडीयूमधील मतभेदांचा फटका जेडीयूला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजप सत्तास्थापनेच्या वेळी जेडीयूला बाजूला सारुन लोजपला हाताशी धरेल, अशी अटकळही बांधली जात होती. आपली सत्ता आल्यास नितीशकुमारांना तुरुंगात पाठवू, असा इशाराही चिराग पासवान यांनी दिल्याने ते कुठल्याही परिस्थितीत भाजप-जेडीयूची साथ देणार नाहीत, असे मानले जाते. मात्र भाजपला एकट्याला सत्तास्थापन करायची झाल्यास पासवान ‘किंगमेकर’ ठरु शकतात.

लोजप-जेडीयू संघर्षाचा इतिहास
बिहारमध्ये 2005 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. फेब्रुवारी-मार्च महिन्यात राज्यात नवीन राजकीय समीकरणे निर्माण होऊ लागली. लोजपचे संस्थापक रामविलास पासवान यांनी लालू आणि नितीश यांच्याविरोधात एकट्याने लढा देण्याचा निर्णय घेतला होता. रामविलास पासवान यांनी जेडीयूबरोबर निवडणूक लढवावी आणि लालूंच्या राजदला पराभूत करण्यात साथ द्यावी, अशी नितीशकुमारांची इच्छा होती, परंतु पासवान यांनी नितीशकुमारांचे ऐकले नाही.

विधानसभा निवडणुकीत लोजपने 178 जागांपैकी 29 जागा जिंकल्या. परंतु कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. म्हणूनच, नितीश यांचे सत्तास्थापनेसाठी जुळवाजुळव करण्याचे प्रयत्न सुरु झाले. नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा पासवान यांना आपल्यासोबत येण्यासाठी साद घातली, परंतु पासवान यांनी त्यांचा प्रस्ताव धुडकावला. मुस्लिम उमेदवारांला मुख्यमंत्री बनवण्याच्या निर्णयावर नितीशकुमार यांना पासवान यांचे पाठबळ हवे होते, परंतु लोजपने त्याला पाठिंबा देण्यास नकार दिला, असे म्हटले जाते.

निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली होती, पण राज्यात कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करता आले नाही. त्या काळात नितीशकुमारांवर लोजपच्या आमदारांची फोडाफोडी करण्याचा आरोपही करण्यात आला होता, मात्र त्यांनी हे दावे फेटाळले होते. जेडीयूचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि लोजपच्या सततच्या नकारांमुळे ऑक्टोबर-नोव्हेंबर 2005 मध्ये राज्यात पुन्हा विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या. दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड मोठी दरी निर्माण झाली, त्याचा परिणाम या विधानसभा निवडणुकीतही स्पष्टपणे दिसून येतो. (Bihar Election Result 2020 Nitish Kumar JDU may affected by dispute with Chirag Paswan LJP LIVE Updates)

बहुमत न मिळाल्यामुळे बिहारमध्ये जेव्हा दुसर्‍यांदा विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या तेव्हा लोजपच्या 19 जागा कमी झाल्या. त्यांना केवळ 10 जागा जिंकता आल्या होत्या. परिणाम जेडीयू-भाजप युतीने बिहारमध्ये सरकार स्थापन केले. नितीशकुमार यांना पहिल्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली.

ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment