Bihar Politics : नितीश कुमार आजच राजीनामा देणार?? बिहारमध्ये मोठा उलटफेर होणार

Bihar Politics Lalu Nitish
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Bihar Politics । बिहारच्या राजकारणात आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) हे आजच आपल्या पदाचा राजीनामा देणार असून भाजपसोबत पुन्हा एकदा सत्तास्थापन करून ९ व्यांदा मुख्यमंत्री होणार आहे. जेडीयूच्या विधिमंडळ पक्षाची आज सकाळी १० वाजता बैठक होणार आहे. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर नितीश कुमार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. नितीशकुमार यांच्या या भूमिकेमुळे इंडिया आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

बिहारमध्ये मोठा उलटफेर होणार- Bihar Politics

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आज दुपारी ३ वाजता पाटणा येथे पोहोचणार आहेत. त्यांच्यासोबत चिराग पासवानही पाटण्यात येणार आहेत. त्यानंतर पाटण्यात भाजपच्या आमदार, खासदारांची बैठक पार पडेल आणि नंतर नव्या सरकारची स्थापना होईल. नितीशकुमार आधी आपला राजीनामा देतील आणि मग भाजप तसेच अन्य मित्रपक्षांसोबत नवं सरकार स्थापन करतील. या एकूण सर्व राजकीय घडामोडींवर राजदने मात्र कोणतीही प्रतिक्रिया अजून तरी दिलेली नाही.

यापूर्वी बिहारमध्ये (Bihar Politics) नितीशकुमार आणि भाजप यांचे सरकार होते, नंतर २०२२ मध्ये त्यांनी भाजपशी फारकत घेऊन राजदसोबत आघाडी केली आणि तेजस्वी यादव हे उपमुख्यमंत्री झाले. मात्र आता पुन्हा एकदा नितीशकुमार यांनी राजकीय पलटी मारली असून थेट भाजपसोबत सत्तास्थापन करणार आहे. खरं तर नितीशकुमार याना इंडिया आघाडीत महत्वाचे स्थान होते आणि भाजपविरोधी लढ्यासाठी देशभरातील विरोधकांना एकत्र आणण्यासाठी नितीशकुमार यांनीच पुढाकार सुद्धा घेतला होता, मात्र आता तेच भाजपसोबत जाणार असल्याने बिहारच्या राजकारणाला आणि इंडिया आघाडीला नवं वळण लागणार हे नक्की.