पत्नीने दिली पतीच्या हत्येची सुपारी; बॉयफ्रेण्ड म्हणाला नवरा मेल्यावर कर्जमाफी मिळेल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कटिहार : वृत्तसंस्था – बिहारच्या कटिहारमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एक पत्नीने तिच्या पतीच्या हत्येची सुपारी दिली होती. अवैध शारीरिक संबंधांच्या इच्छेने सात जन्मांच्या नवऱ्याला पत्नीने ठार मारले. अवघ्या ५० हजार रुपयांत पत्नीने आपल्या पतीच्या हत्येची सुपारी दिली होती. कटिहारमधील डेहरिया गावात राहणाऱ्या ट्रकचालकाची 20 जूनच्या रात्री हत्या झाली होती. धर्मेंद्र रविदास आपल्या घरात झोपला असतानाच घरात घुसून गोळी झाडून त्याची हत्या केल्याचे पोलिसांना सांगण्यात आले होते.

पोलिसांना तपासादरम्यान धर्मेंद्रच्या पत्नीवरच संशयाची सुई फिरत होती. पुढे पत्नीच्या अनैतिक संबंधांची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानंतर पोलिसांचा संशय खात्रीत जमा झाला. धर्मेंद्र रविदास यांची पत्नी संजूला यांचे राजू कुमार नावाच्या व्यक्ती सोबत ६ महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. महिनाभरापूर्वी दोघांनी धर्मेंद्रला ठार मारण्याचा कट रचला होता. प्रत्यक्षात पत्नीने पतीच्या नावावर बंधन बँकेकडून ९० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. तिच्या प्रियकराने तिला सांगितले होते की, पतीच्या निधनानंतर कर्ज माफ केले जाईल. त्यानंतर पत्नीने कर्जमाफी आणि बेकायदेशीर विवाहबाह्य संबंधात अडकलेल्या पतीचा जीव घेण्याचा कट रचला.

प्रियकराच्या सांगण्यावरुन संजुलाने 50 हजार रुपयांची सुपारी देऊन पूर्णियातून काँट्रॅक्ट किलर्सना बोलावले. त्यांना 18 हजार रुपयांचा अ‍ॅडव्हान्स दिला. पती झोपल्याची सूचना संजुलाने दिल्यानंतर सुपारी किलर त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी गोळी झाडून धर्मेंद्रची हत्या केली. पोलिसांनी आरोपींना अटक करुन बंदूक आणि काडतुसं, बाईक जप्त केलं आहे.पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.