गुजरातमध्ये भाजपच दादा; काँग्रेस -आपचा सुफडा साफ

gujarat election result
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण देशाचे लक्ष्य असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपने पुन्हा एकदा विजय मिळवत आपला गड राखला आहे. यंदा गुजरातमध्ये आम आदमीच्या एंट्री मुळे तिरंगी लढत पहायला मिळाली होती. परंतु आपचा फटका हा भाजपला नव्हे तर काँग्रेसलाच बसल्याचे स्पष्ट झालं.

गुजरात विधानसभेसाठी एकूण १८२ जागांसाठी मतदान झालं. यामध्ये तब्बल १५२ जागांवर भाजप आघाडीवर दिसत आहे. काँग्रेसला फक्त २१ जागांवर आघाडी आहे तर ज्या आम आदमी पक्षाने प्रचाराच्या सुरुवातीपासून ते मतदानाच्या दिवसापर्यंत हवा निर्माण केली त्या आपला अवघ्या ६ जागांवर आघाडी मिळवता आली आहे. त्यामुळे मोदी शाहच्या या बालेकिल्ल्यात काँग्रेस आणि आपचा सुफडा साफ झाला आहे.

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसच्या जागांमध्ये मोठी घट झाली आहे. गटनिवडणुकीत भाजपला ९९ तर काँग्रेसला ७७ जागा मिळाल्या होत्या. मात्र आत्ताचे निकाल पाहता काँग्रेसच्या जागा निम्म्याहून कमी झाल्याचे दिसत आहे. भाजपची जबरदस्त निवडणूक स्ट्रॅटेजी, मोदी शहांचा सभांचा धडाका, मोदींनी गुजरात मध्ये केलेला विकास आणि भाजपची गुजरातमध्ये आधीपासून असलेली पाळेमोळे यामुळे भाजपला पुन्हा एकदा सत्ता राखण्यात यश मिळालं आहे असेच म्हणावं लागेल.