हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होत असून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील काही राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पण अशीच परिस्थिती चालू राहिली तर देशात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन होणार का असा प्रश्न केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याना विचारलं असता त्यांनी स्पष्टच उत्तर दिले.
देशात लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घाईगडबडीत घेतला जाणार नाही. सध्या तरी तशी परिस्थिती दिसत नाही. केंद्राकडून तत्परता दाखवली जात नाही, असं नाही हे खरं नसल्याचं अमित शहा यांनी म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत शहा बोलत होते. यावेळी त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले.
लसीकरणासंदर्भात वैज्ञानिकांशीही चर्चा सुरू आहे. करोनाशी लढण्याची पूर्ण तयारी केली जात आहे. करोना संक्रमण प्रसाराचा वेग प्रचंड असल्यानं लढा देणं थोडं कठिण आहे. पण, मला विश्वास आहे की, आपण त्यावर विजय मिळवू,” असं अमित शाह यांनी स्पष्ट केलं.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.