2 मे पर्यंत तरी पाय ठीक व्हावा जेणेकरून राजीनाम्यासाठी तरी चालत जाल; शाहांचा ममतांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजप आणि तृणमूल काँग्रेस मध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैली चालूच आहेत. भाजप कडून थेट मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला जात असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ममतांवर कडक शब्दात टिका केली आहे. तसेच भाजप 122 हून अधिक जागांवर विजय मिळवेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

शाह म्हणाले, की पश्चिम बंगालमधील पाच टप्प्यांच्या निवडणुकांनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हताश झाल्या आहेत कारण 122 हून अधिक जागांवर भाजप त्यांच्या पुढे आहे. शाह म्हणाले, भाजप उमेदवार शुभेंदु अधिकारी नंदीग्राममध्ये निवडून येतील. गृहमंत्री पुढे म्हणाले, की बॅनर्जी यांचं स्थान पाहाता त्यांना मोठ्या पराभवानं परत पाठवणं गरजेचं आहे.

अमित शाह यांनी ममता बॅनर्जी यांना झालेल्या दुखापतीचाही उल्लेख केला. ते म्हणाले, आशा आहे की 2 मेपर्यंत दीदींच्या पायाला झालेली दुखापत ठीक होईल. जेणेकरुन राज्यपालांकडे आपला राजीनामा देण्यासाठी त्या पायी जाऊ शकतील.असे अमित शहा म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

You might also like