काही गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात ; पवारांच्या भेटीवर अमित शहांचं सूचक वक्तव्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची बातमी समोर येत आहे. अहमदाबाद येथे ही भेट झाली असून यावेळी राष्ट्रवादीचे बडे नेते प्रफुल्ल पटेल देखील होते असेही समोर येत आहे. दरम्यान अमित शहा यांना याबाबत विचारले असता त्यांनी सूचक वक्तव्य केले.

काही गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात, असं शहा यांनी म्हटलं आहे. शरद पवारांसोबत भेट झाल्याच्या वृत्ताचं खंडन अमित शहा यांनी केलेलं नाही. त्यामुळेच शहांचं विधान महत्त्वाचं मानलं जात आहे.

अहमदाबादमधील एका फार्महाऊसवर २६ मार्चला रात्री ९.३० वाजता पटेल आणि बड्या उद्योगपतीची भेट झाली. विशेष म्हणजे ही भेट होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारदेखील गुजरातमध्येच होते. मात्र ते या बैठकीला उपस्थित होते का, हे समजू शकलेलं नाही. याशिवाय शरद पवार, प्रफुल्ल पटेल यांची भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत गुप्त बैठक झाल्याचं वृत्त दिव्य भास्कर या वृत्तपत्रानं दिलं आहे. या भेटीसाठी पटेल आणि पवार प्रायव्हेट जेटनं शांतिग्राममधल्या गेस्टहाऊसला आले असल्याचा दावा वृत्तात करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीने वृत्त फेटाळले-

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मात्र ही अफवा असल्याचं सांगत भेटीचं वृत्त नाकारलं आहे. शरद पवार यांनी भाजप नेत्यांची भेट घेण्याचा प्रश्नच येत नाही. भाजपने गुजराती वर्तमानपत्रातून अशा बातम्या पेरल्या आहेत, असा दावा मलिक यांनी केला.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment