हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि…; अमित शहांचे उद्धव ठाकरेंना आव्हानc

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि मैदानात या आम्ही तुमच्याशी दोन हात करायला तयार आहोत, असं खुलं आव्हान भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं. अमित शहा पुणे येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी थेट ठाकरे सरकार जोरदार हल्लाबोल केला.

मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेनं हिंदुत्व बाजूला ठेवलं आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून 2019 मध्ये भाजपसोबत विश्वासघात केला. सत्तेतून पायउतार व्हा आणि मग मैदानात उतरुन दोन – दोन हात करु. जनता कुणाला कौल देते हे पाहूयात. तिन्ही पक्षाने एकत्र लढून भाजपला हरवून दाखवावे, असं आव्हान केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी दिलेय.

ते पुढे म्हणाले, राज्यातील आघाडी सरकार म्हणजे तीन चाकांचं ऑटोरिक्षावालं सरकार आहे. या सरकारचे तिन्ही चाकं पंक्चर झालेले आहेत. ते चालत नाही. फक्त धूर सोडतं आणि प्रदूषण करतं. हे निकम्म सरकार आहे. या सरकारच्या पतनाची सुरुवात पुणे महापालिकेच्या निकालाने झाली पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं