पणजी | राफेल विमान खरेदी घोटाळ्यावरून देशभरातील वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपा आणि काँग्रेस पक्ष राफेल प्रकरणावरुन एकमेकांवर ताशेरे ओढताना दिसत आहेत. यापार्श्वभुमीवर माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या गोव्यात देखील त्याचे पडसाद उमटले. राजधानी पणजी येथे आज भाजपा कार्यकर्ते निषेध मोर्चा घेऊन आलेले असताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भिडले आणि दोन्ही पक्षांच्य़ा कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. यामुळे पणजी आणि परिसरात काही काळासाठी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
हाती आलेल्या माहितीनुसार, गोवा भाजपने राफेल प्रकरणी काँग्रेसने केलेल्या आरोपांच्या निषेधार्थ मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी भाजपा आणि काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यात समोरासमोर आले. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या नेत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. पाहता पाहता शाब्दीक चकमकीचे रुपांतर हाणामारीत झाले आणि भाजप – काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफाण हाणामारी झाली. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी एकमेकांवर पाण्याच्या, दारूच्या बाटल्या, चप्पल फेकण्यास सुरुवात केली होती. रात्री उशिरा दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात पोलिसात तक्रारी नोंदवल्या आहेत.
राफेल विमान प्रकरणात न्यायालयाने क्लीन चीट दिली असली तरी राफेल मध्ये घोटाळा आहेच अशी ठाम भूमिका काॅंग्रसने घेतलेली आहे. काॅंग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी हा मुद्दा उचलून धरलेला असताना कार्यकर्तेही राफेल प्रकरणाबाबत गाभीर्य दाखवत आक्रमक भुमिका घेत असताना दिसत आहेत. त्याचेच पडसाद आज गोव्याची राजधानी पणजी येथे पाहायला मिळाले.
ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
दादा कोंडके आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातला याराना तुम्हाला माहीती आहे का?
शरद पवारांनी मला कळकळून मिठी मारली आणि सांगीतलं तुम्ही आमचेच आहात – उदयनराजे भोसले
शरद पवार पुण्यातून लढवणार लोकसभा ?