80 व्या वर्षांचा नवरदेव मुंडावळ्या बांधून….; भाजपची शरद पवारांवर टीका

0
114
sharad pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना यूपीएचं अध्यक्षपद द्यावे असा प्रस्ताव युवक राष्ट्रवादी राष्ट्रीय कार्यकारणीने केल्यानंतर चर्चाना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार अनिल बोंडे यांनी पवारांवर निशाणा साधला. 80 व्या वर्षांचा नवरा मुंडावळ्या बांधून युपीएच्या अध्यक्ष पदासाठी तयार आहे अशी टीका त्यांनी पवारांवर केली.

एका वृत्तवाहिनीवर बोलताना अनिल बोंडे म्हणाले, शरद पवारांनी स्वतःचीच आरती स्वताच ओवाळून घेतली. त्यांना युपीएच्या कोणत्याही घटकाने प्रस्तावही दिलेला नाही. तुम्ही युपीएचे अध्यक्ष व्हा म्हणून आमंत्रण दिलेले नाही. म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसला हाताशी धरून स्वतःच्याच उपस्थितीत प्रस्ताव मंजूर करून घेतला.

मुंडावळ्या बांधून नवरदेव सजलेला आहे, घोड्यावरही बसलेला आहे. आता युपीएचे घटकपक्ष त्यांचा प्रस्ताव स्वीकारतात का हे पाहावं लागेल असा टोला अनिल बोन्डे यांनी पवारांना लगावला काँग्रेसचे सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी असो किंवा आपले नाना असो, त्यांना पवार अध्यक्ष म्हणूंन चालतील का ?? कदाचित पवार यांनी फिल्डिंग लावली असेल. काँग्रेसचा नाराज G 23 किंवा प्रशांत किशोर मार्फत पवारांनी फिल्डिंग लावली असेल अशी शंकाही अनिल बोन्डे यांनी उपस्थित केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here