स्वार्थासाठी युतीमध्ये मिठाचे खडे कोणी टाकले? शेलारांचा संजय राऊतांना सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आमची 25 वर्ष युतीमध्ये सडली अस विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर राज्यातील भाजप आक्रमक झाले असून युतीच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या स्थापने वरून भाजप नेत्यांचे कान टोचल्यानंतर आशिष शेलार यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. स्वार्थासाठी युतीमध्ये खडे टाकणारे टाकणारे कोण होते असा सवाल त्यांनी केला.

आमची बाळासाहेब यांच्याबरोबर असणारी युती ही वैचारीक युती होती. बाळासाहेब यांच्यासोबत असणाऱ्या युतीचा आम्हाला अभिमानाच आहे. मुंडे महाजन यांनी युती टिकवली, पुढच्या पिढीने स्वार्थासाठी मीठ टाकले, युतीमध्ये मिठाचे खडे कोणी टाकले ? असा सवाल आशिष शेलार यांनी केला.

संजय राऊतांचा जन्म हा १९६१ ला झाला. शिवसेनेची स्थापना १९६६ रोजी झाली. तुम्ही स्वतःला कधीपासून इतिहासाचार्य समजू लागलात ? असाही सवाल संजय राऊतांनी यावेळी केला. संजय राऊतांना खुल्या चर्चेला यावे असे आव्हान आशिष शेलार यांनी यावेळी दिले.

दरम्यान, संजय राऊत यांनी काल काढलेल्या व्यंगचित्रा वरूनही त्यांनी राऊतांवर निशाणा साधला. प्रमोद महाजन यांचे व्यंगचित्र हे जून आहे. आत्ताच ते मुद्दामून प्रसारित करण्याचा राऊतांचा नेमका हेतू काय ? तुमच्या विषयातल कार्टून काढले तर नेव्हीच्या अधिकाऱ्याचा डोळा फोडला जातो. आता तुम्ही दुटप्पी भूमिका घेऊ नका, असाही टोला राऊतांनी लगावला.

Leave a Comment